जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण

बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण

बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा

बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बुलढाणा, 20 डिसेंबर : राज्यात आज 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास बऱ्याच जिल्ह्यातील निकाल हे स्पष्ट झाले आहे. 7751 पैकी 4935 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस चौथ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक पक्ष आपणच मोठा असल्याचा दावा करत आहे. यातून बुलढाणा जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. एका सरपंचावर चक्क तीन पक्षांनी दावा केला आहे. काय आहे प्रकार? बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लोखंडा येथे दुर्गा श्रीकृष्ण ठाकरे या सरपंचपदी थेट जनतेतून निवडून गेल्या आहेत. मात्र, या नवनियुक्त महिला सरपंचांचा काँग्रेस, भाजप त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे निवडून आलेल्या महिला सरपंच कोणत्या पक्षाच्या? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे निवडून आलेल्या एका महिला सरपंचावर तीन पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांचे डोके चक्रावले आहे. वाचा - gram panchayat election result : भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, शिवसेनेचं काय? भाजप नंबर एकचा पक्ष आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 2089 जागांवर आघाडीवर आहेत महाविकास आघाडी 2006 जागांवर आघाडीवर आहे. अवघ्या काही जागांसाठी कांटे की टक्कर सुरू आहे. आतापर्यंत 4993 जागांचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपने 1455 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे गटाने 639 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 495 आणि काँग्रेस 495 गटावर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शिंदे गटाला भारी पडली आहे. राष्ट्रवादीने 935 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी पक्षाचे पुरस्कृत हे पॅनल असल्याचे समोर आले आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात