जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य

खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य

खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य

खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य

कामावरून घरी आल्यानंतर अण्णाप्पाने श्रीदेवीला खाऊ आणायला मंगळवारी घरातून बाहेर नेलं. त्यानंतर रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत मुलगी नव्हती.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    सांगली, 18 मार्च : दारूच्या नशेत चार वर्षांच्या चिमुकलीला बापानेच विहिरीत टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यातील कुरळपमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी अण्णाप्पा तुकाराम कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अण्णाप्पा कोळी आणि त्याचे कुटुंब कडकलक्ष्मीचा व्यवसाय करते. कुरळपमधील माळरानावर सध्या ते वास्तव्यास आहेत. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील खुपशिंगी इथला आहे. गेल्या काही वर्षांपासून अण्णाप्पा हा पत्नी आणि दोन मुलींसह कुरळपमध्ये राहत आहे. लहान मुलीसह पत्नी घरातून निघून गेली होती संगमनेरमध्ये भीषण अपघात; टँकर-दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 1 जखमी कामावरून घरी आल्यानंतर अण्णाप्पाने श्रीदेवीला खाऊ आणायला मंगळवारी घरातून बाहेर नेलं. त्यानंतर रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत मुलगी नव्हती. नातेवाईकांनी याबाबत चौकशी केली त्यावेळी अण्णाप्पाने मुलीला कुरळप-येलूर रस्त्यावरच्या विहिरीत फेकल्याचं सांगितलं. कुरळप पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि मृतेदह शोधण्यासाठी बुधवारी पहाटेपर्यंत शोधमोहिम राबवण्यात आली. रात्रभर पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना मृतदेह आढळला. या प्रकरणी भीमराव तुकाराम कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास केला जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात