संगमनेर, 18 मार्च: संगमनेरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर - अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
मृतांची नावं
ऋषीकेश हासे ( वय वर्षे 20 ), सुयोग हासे ( वय वर्षे 20 ), निलेश सिनारे ( वय वर्षे 26 ) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident