मुंबई, 04 डिसेंबर: मैत्री म्हंटलं की आपल्याला अनेक सिनेमांमधील अनेक जोड्या आठवतात. मित्रांसाठी जीभ पणाला लावणाऱ्या काही गोष्टीही आठवतात. जो मित्र सुखात नाहीतर दुःखात मदतीला धावून येईल तोच खरा मित्र असं आपण सतत ऐकतही असतो. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा कोणता खरा मित्र आणि कोणता मित्र खोटा हे लक्षात येतं. पण मैत्रीला कसं जागावं याच उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यातील काही लहानग्यांनी दाखवून दिलं आहे. नक्की घडलंय काय? जाणून घेऊया.
त्याचं झालं असं की सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नागाव कवठ्याच्या जिल्हा परिषद शाळेत एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकाकडून औषध पाणीही करता येण्यासारखी आर्थिक स्थिती नव्हती. दिवसभर हा मुलगा वर्गात बसला असताना पुरळ उठलेल्या ठिकाणी खाजवत असे. त्याची अवस्था पाहून पाचवीत शिकणाऱ्या त्याच्या आठ ते दहा मित्रानी खाऊसाठी दिलेले पैसे गोळा केले. आणि मित्राच्या औषधासाठी खर्च करण्यात आले.
12वीनंतर द्या 'या' महत्त्वाच्या परीक्षा; थेट परदेशात मिळेल शिक्षणाच्या संधी; आजच सुरु करा तयारी
विशेष म्हणजे या औषधामुळे मित्राच्या अंगावरील 90% पुरळ आणि वरण कमी झाले आहेत. मित्रासाठी काहीतरी केल्याचे अथवा उपकार केल्याची भावनाही या मित्रांमध्ये नव्हती. शेवटी यालाच म्हणतात ना मैत्री. त्यांनी ही गोष्ट शिक्षक अथवा पालकांनाही सांगितली नाही.
या मित्रांमध्ये असलेल्या एका मुलाच्या वडिलांनी तब्बल 15 दिवसांनी या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केली असता मित्रांसाठी मित्रांनी केलेले हे कर्तव्य पाहून अचंबित झाले. आणि त्यांनी शाळेत आणि सोशल मीडियावर या मैत्रीचे नाते पसरवले. हे पाहून गावातील डॉक्टर संदीप पाटील यांनी या मित्रासमूहाच्या भेट घेऊन या मुलांना खाऊसाठी प्रत्येकी शंभर रुपये आणि आजारी मुलाच्या औषधासाठी 1 हजार रुपये देऊन जाणत्या वयातील मैत्रीला सलाम केला.
काय दिवस आलेत राव! चक्क उंदीर पकडण्यासाठी मिळतोय 1.3 कोटी रुपये पगार
आमच्या शाळेत मुलाच्या मध्ये एवढ भावनिक नाते जपले हे आमच्या साठी भाग्याची गोष्ट आहे. असे विद्यार्थी आमच्या शाळेत घडत आहेत याचा अभिमान आहे. यापुढे मुलाची कोणतेही अडचण असेल तर आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शाळेच्या प्राध्यापकांनी आश्वासन दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Friendship, Maharashtra News, Sangali