सांगली, 16 जानेवारी : ऑनलाईनच्या जमान्यात आता काहीच लपून राहिलेले नाही. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत ऑनलाईन व्हिडिओ पाहून अनेकजण वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. असाच एक भन्नाट प्रयोग सांगली त राहणाऱ्या 14 वर्षीय रांचोने केला आहे. केवळ 50 हजारांमध्ये त्याने इलेक्ट्रिक कार तयार केली असून बग्गी असं भन्नाट नाव देखील ठेवलं आहे. अशी बनवली गाडी सांगली शहरातील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारका जवळ अर्जुन खरात हा राहतो. त्याने YouTube वर व्हिडिओ पाहून टाकाऊ वस्तूच्या वापरातून 50 हजार रुपये खर्च करून इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही गाडी बनवण्यासाठी त्याला दोन वर्ष मेहनत करावी लागली आहे. त्याने गाडीला बग्गी असं नाव दिलं आहे. एका चार्जमध्ये 35 किमी प्रवास विशेष म्हणजे सहा तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी 35 किलोमीटरपर्यंत धावू शकते असा दावा त्याने केला आहे. अर्जुनचे वडील महेश खरात व आजोबा यांनी त्याला आर्थिक मदत केली. यातून त्याचे यूट्यूबच्या माध्यमातून चक्क चार चाकी गाडी तयार केली. सहा तास बॅटरी चार्जिंग केल्यानंतर सुमारे 30 ते 35 किलोमीटर आता ही गाडी चालत आहे.
गाडी तयार करायचे कोणतेही प्रशिक्षण अर्जुनने घेतलेलं नाही. मोबाईल पाहूनच त्याने गाडी तयार केली. अहिल्यानगर रोडवर तो गाडी फिरवत असताना लोक गर्दी करून गाडी पाहत आहेत. 14 वर्षाच्या अर्जुन खरातची ही भन्नाट गाडी पाहून सर्वजण कौतुक करत आहेत. Video : विद्यार्थ्यांचा भन्नाट प्रयोग, कॉलेजमधील झाडं लागली बोलायला! गाडी बनवण्याची इच्छा संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर दोन तास अभ्यास करायचा आणि उरलेल्या वेळेत युट्यूब पाहून हे चार चाकी गाडी तयार केली आहे. गाडी तयार करण्याची माझी इच्छा होती आणि ती मी पूर्ण केली असल्याचं अर्जुन सांगतो.

)







