बीड, 16 जानेवारी : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वत्र होत आहे. याच तंत्रज्ञानातून बीडमधील तब्बल 700 झाले बोलायला लागली आहेत. गेवराई तालुक्यातील र. भ. अट्टल महाविद्यालयात एक अभिनव उपक्रमाअंतर्गंत झाडांवर क्युआर कोड बसवण्यात आला असून त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी वा इतर वापर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे.
झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीदवाक्य आपण नेहमीच ऐकतो. मात्र झाडे लावले तर जातात मात्र संगोपन होत नाही. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील र.भ अट्टल महाविद्यालयाने कॉलेजच्या परिसरात वनराई फुलवली आहे. विविध प्रकारचे झाडे कॉलेज परिसरात असून कॉलेज शहरातील ऑक्सिजन हब बनले आहे.
700 झाडांना क्युआर कोड
झाडांची माहिती मोबाईलद्वारे स्कॅन करून मिळवता येत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे व बॉटनी विभागातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला आहे. आतापर्यंत 700 झाडांना क्युआर कोड लावण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 2 हजाराहून अधिक झाडे आहेत. या झाडांवर देखील क्युआर कोड लावण्यात येणार आहे.
Video: 81 फोर आणि 18 सिक्स! नागपूरच्या 13 वर्षाच्या यशनं काढले 508 रन
वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे
कडू लिंबू, तुळस, कोरफड, अडुळसा, कुडा, बदाम, दंड, पिंपळ, चिंच, जांभूळ, गुलाब, बांबू, आशा विविध प्रजातीच्या झाडांची लागवड महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करता यावा म्हणून ओपन स्टडीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. महाविद्यालयातील परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून आम्ही हा उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांवर हे किंवा क्युआर कोड लावण्यात आले आहेत. यामाध्यमातून झाडांची पूर्ण माहिती एका क्लिकवर मिळत असल्याचे प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.