जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मित्र भांडला म्हणून तिघांनी मिळून त्याला संपवला, पण पुढे घडलं भयानक कांड, सांगलीतील घटना

मित्र भांडला म्हणून तिघांनी मिळून त्याला संपवला, पण पुढे घडलं भयानक कांड, सांगलीतील घटना

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनी आपल्या मित्राचा अपहरण करून त्याचा खून केला

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनी आपल्या मित्राचा अपहरण करून त्याचा खून केला

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनी आपल्या मित्राचा अपहरण करून त्याचा खून केला

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

आसिफ मुरसल, प्रतिनिधी  सांगली, 06 मार्च : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनी आपल्या मित्राचा अपहरण करून त्याचा खून केला. नुसतं खून करून ते थांबले नाही तर मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले आणि जाळून टाकला.  त्यानंतर मृतदेहाची राख नदीत फेकून दिली. एखाद्या सिनेमात शोभावी अशी धक्कादायक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील बावची या ठिकाणी ही घटना घडली आहे. ओंकार रकटे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ओंकार रकटे (वय 23) या तरुणाचा अपहरण करून खून करत त्याचा मृतदेह जाळून टाकला, त्यानंतर हाडे नदीत टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे, ओंकार याच्या मित्रांनीचे हा खून केल्याची बाबसमोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशा तिघा मित्रांना अटक केली आहे. (24 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली 48 वर्षांची महिला, 4 मुलांची आई; पती म्हणाला…) नेमकं काय घडलं? पंधरा दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे याच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाली होती. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात निर्माण झाला होता. यातून सम्मेदने आपल्या मित्रांसमवेत ओंकार रकटे याचे अपहरण केलं होतं. त्यानंतर ओंकार याला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला. खुनाच्या घटनेनंतर ओंकार याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. (नागपूर : अल्पवयीन गर्भवती मुलीने Youtube पाहून केली स्वत:ची प्रसूती, बाळासोबत घडलं भयानक) त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे, ही पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली होती, अशी कबुली तिघा संशयित मित्रांनी दिली. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. असे सापडले तिघे मारेकरी ओंकारला कारमध्ये टाकून अपहरण केले होते. याबद्दल त्याचा मित्र सूरज सरगर याने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाअंती गुप्त खबऱ्याच्या मार्फत सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे या तिघांनी ओंकार रकटे याचं अपहरण केलं असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतलं. सुरुवातील तिघांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच भरत काटकरने खूनाची कबुली दिली. बेदम मारहाण केल्यानंतर मफलरने गळा आवळून खून केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात