नागपूर, 5 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. सोशल माडियावर ओळखीनंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील या घटनेने मोठी खळबळ उडाली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण - गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती. त्यामुळे तिने हे धाडस केले, ते युट्यूब बघून केले असावे, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, पीडितेने अजून तरी याबद्दल पोलिसांना माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बस स्थानकावर रोड रोमिओचे विकृत कृत्य, लोकांनी धू धू धुतले दरम्यान, बाळ जन्मल्या नंतर बाळाचा मृत्यू झाला आणि बाळाचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळला. त्यामुळे या घटनेत ही घातपाताची शक्यता आहे, असे पोलिसांना वाटत आहे. मात्र, पोस्टमार्टम नंतर बाळाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. जन्मलेले बाळ हालचाल करत नव्हते. त्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला, असे पीडितचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी या मुलीची आरोपी तरुणासोबत इंस्ट्रग्रामवर ओळख झाली. त्या नंतर एक दिवस त्याने पीडितेवर अत्याचार केला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवला होता. घटनेनंतर पोलिसांनी आता आरोपीच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.