मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वय फक्त 25 अन् गड्यानं केली कमाल, सव्वा एकरातून कमावले तब्बल 23 लाख

वय फक्त 25 अन् गड्यानं केली कमाल, सव्वा एकरातून कमावले तब्बल 23 लाख

प्रतिक पुजारी हा युवा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील रहिवासी आहे.

प्रतिक पुजारी हा युवा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील रहिवासी आहे.

प्रतिक पुजारी हा युवा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील रहिवासी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  Khushalkant Dusane

सांगली, 9 डिसेंबर : एकीकडे आजची तरुणाई बेरोजगारीने ग्रस्त आहे. तर दुसरीकडे हीच तरुणाई सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे. मात्र, सांगलीतील एका 25 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने कमाल करुन दाखवली आहे. या तरुण शेतकऱ्याने फक्त सव्वा एकरात तब्बल 23 लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

प्रतिक पुजारी असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. पण या तरुणाने योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरघोस उत्पादन घेतले. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील प्रतिक पुजारी या तरुणाने नेमकं एवढं भरघोस उत्पादन कसं घेतलं? याबाबत जाणून घेऊयात.

पपईच्या 1 हजार 100 झाडांची लागवड

प्रतिक पुजारी हा युवा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या सव्वा दोन एकरवर क्षेत्रावर '15 नंबर' या पपईच्या वाणाची लागवड केली असून या सव्वा एकरमध्ये जवळपास 1 हजार 100 पपईची झाडे लावली आहेत. त्याला ही पपईची बाग लावून दोन वर्ष झाली. तसेच मागील 18 महिन्यांपासून या पपईचे उत्पादन सुरुच आहे. आत्तापर्यंत 210 टन पपईचे उत्पादन निघाले असून या उत्पादनातून तब्बल 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पपईच्या शेतीचे नियोजन कसे -

या पपईच्या शेतीसाठी रासायनिक तसेच सेंद्रीय खतांचा वापर केला. तसेच जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवला. यासोबत पिकांची फेरपालट केली. पपईच्या लागवड करण्यापूर्वी मातीचं परिक्षण केलं. पाण्याचे योग्य नियोजन केले. ड्रीप पद्धतीनं बागेला पाणीपुरवठा केला. बागेसाठी सर्व औषधे ही एस व्ही अॅग्रो कंपनीची वापरली आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.

हेही वाचा - 12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा माल

प्रतिकने सर्व पपईची विक्री ही मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये केली आहे. पपईला चांगली मागणी असल्यामुळे त्याला फायदा झाला आहे. त्याला योग्य नियोजन आणि चांगल्या दराचा फायदा फायदा झाला आहे. अशाप्रकारे या तरुण शेतकऱ्याने योग्य नियोजनाच्या आधावरावर अगदी कमी वयात यशस्वी शेतकरी होण्याकडे वाटचाल केली आहे.

First published:

Tags: Career, Farmer, Sangli, Success story