सांगली, 14 ऑक्टोंबर : कधी कोणाचे डोके सनकेल काही सांगता येत नाही. कोण रागाच्या भरात गोळीबार करतो तर कोण आनंदाच्या भरात गोळीबार करतो. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात घडली आहे. इस्लामपूर शहर हे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे गाव म्हणून ओळखले जाते. दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने कवालीचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा नगरसेवक जयंत पाटील यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या महितीनुसार, इस्लामपूर मोमीन मोहल्ला येथे कवाली कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि.10) ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता आमिल आरिफ साबरी यांचा बज्मे कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमवेळी हा प्रकार घडला आहे.
#सांगली : इस्लामपूर मोमीन मोहल्ला येथे कवाली कार्यक्रमात हवेत गोळीबार pic.twitter.com/EuGJFQu0Io
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2022
हे ही वाचा : मुलाने खरंच 14 महिन्यात मिळवली पीएचडी? अखेर किरीट सोमय्यांनी केला खुलासा, म्हणाले…
चार दिवसांपूर्वी मोमीन मोहल्ला येथे कवालीचा कार्यकम झाला. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कवालीच्या मंचावरूनच त्यांनी हवेत गोळीबार केलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हवेत गोळीबार करणारा व्यक्ती कोण आणि घटना कधीची याबाबत पोलीस तपास करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोळीबार केलेला माजी नगरसेवक जयंत पाटलांचा निकटवर्तीय
इस्लामपूरमध्ये मागच्या चार दिवसांपूर्वी हवेत गोळीबार केलेला व्यक्ती हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता. तर त्याची पत्नीही माजी नगरसेवक होती. गोळीबार केलेला व्यक्ती हा पिरअल्ली हमिदुल्ला पुणेकर असे त्याचे नाव आहे. त्याने मुन्नाभाई मेहरबान मित्र परिवार यांच्या तर्फे कव्वाली कार्यक्रम आयोजीत केला होता.
हे ही वाचा : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी
या कार्यक्रमाला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान गोळीबार केलेल्या माजी नगरसेवकांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.