मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगलीत कृष्णा नदीची पातळी स्थिर; शहर अद्याप जलमय, एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी

सांगलीत कृष्णा नदीची पातळी स्थिर; शहर अद्याप जलमय, एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी

Sangli Flood Updates:  सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. मात्र ही पाण्याची पातळी  स्थिर झाली आहे.

Sangli Flood Updates: सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. मात्र ही पाण्याची पातळी स्थिर झाली आहे.

Sangli Flood Updates: सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. मात्र ही पाण्याची पातळी स्थिर झाली आहे.

सांगली, 25 जुलै: सांगली (Sangli Flood) शहरातील कृष्णा नदीची (Krisha River) पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. मात्र ही पाण्याची पातळी स्थिर झाली आहे. पण वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय (Waterlogged) झाले आहे. जवळपास 60 टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडलेला आहे. ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली. पण सांगली शहरात आलेल्या पुराने 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सांगली शहरातला शहरी भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. स्टेशन चौकापासून, शिवाजी स्टेडियम, मीरा हाउसिंग सोसायटी, संपूर्ण वखार भाग, एसटी स्टँड परिसर, सांगली शहरातला विस्तारित भाग असणारा शामराव नगर यासह सांगली- कोल्हापुर रोड संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.

या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना प्रशासन असेल सामाजिक संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील,हे नागरिकांना बोट असेल आणि इतर माध्यमातून बाहेर काढण्याचे काम करत आहेत. भीषण अशी परिस्थिती सध्या सांगली शहरात निर्माण झालेली आहे.

सांगली शहरातले जवळपास एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर लाखो लोकांचं स्थलांतर या ठिकाणी झाले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातल्या महापालिकांच्या शाळांमध्ये आणि इतर खासगी ठिकाणी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.

सांगली शहरातल्या महापुराचा फटका जिल्हा कारागृहाला बसला आहे. कारागृहात सध्या पुराचे पाणी शिरले आहे.त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नजीक असणाऱ्या सिटी हायस्कूल या ठिकाणी कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सध्याची सांगलीची परिस्थिती ही 2005 ची पुनरावृत्ती आहे. 2005 मध्ये सांगली शहरातला महापूर आला होता. त्या वेळीही सांगली शहर जलमय झालं होतं. 2005 मध्ये 55 फूट इतकी पाण्याची पातळी होती. सध्याही इतकीची पाणी पातळी सांगली मध्ये कृष्णा नदीची आहे. मात्र तुलनेने अधिक प्रमाणात पाणी शहराच्या इतर भागात शिरल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला कृष्णा नदी आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्याच बरोबर चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे.

पावसाने उघडीप दिल्याने आता पाण्याची पातळी ताकारी आणि भिलवडी याठिकाणी उतरू लागलेली आहे. तकारी या ठिकाणी जवळपास 8 फुटाने उतरली आहे. भिलवडी याठिकाणी 2 फुटांने उतरली असून संथ गतीने पाण्याची पातळी या ठिकाणी ओसरत आहे. तसेच सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी आता स्थिर झालेली आहे. दुपारनंतर हे पाण्याची पातळी हळूहळू ओसरू लागेल,असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

First published:

Tags: Sangli, Sangli news