सांगली, 02 फेब्रुवारी : फिरायला गेलेलं अल्पवयीन प्रेमीयुगुल दुचाकीसह मध्यरात्री विहिरीत पडल्याची घटना बुधवारी सांगलीतील तासगाव तालुक्यात घडली. दुचाकीसह विहिरीत पडलेल्या प्रेमीयुगुलाला बाहेर काढण्यात आलं. पण यातील तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण बचावला आहे. दरम्यान, तरुण-तरुणी शेजारच्याच गावचे असल्यानं याची माहिती गावात पसरली आणि लोकांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली असून पोलिस कसून चौकशी करत आहेत.
अल्पवयीन प्रेमीयुगुल एका ठिकाणी गेले होते. युवतीला तिच्या घरी सोडण्यासाठी तरुण निघाला होता. पण परत येत असताना अंधार असल्यानं तरुणाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात दुचाकीसह ते विहिरीत कोसळले अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानं आता पोलिस चौकशी करत आहेत.
हेही वाचा : जवळच्या मित्रांनीच दिला दगा, अल्पवयीन मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य
दुचाकी विहिरीत पडल्यानंतर तरुणाला पोहता येत असल्यानं तो बाहेर पडू शकला. मात्र पोहता येत नसल्यानं तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर तरुणीच्या पालकांनी तासगाव पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तासगाव पोलिसांनी बचावकार्यासाठी भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमला पाचारण केलं. बचाव पथकाने तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह आणि मोटारसायकल बाहेर काढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangli