मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकरी विहिरीत पडला अन् मृतदेहावर फणा काढून नाग बसला, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

शेतकरी विहिरीत पडला अन् मृतदेहावर फणा काढून नाग बसला, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार?

पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार?

पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार?

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 26 मे : पाण्यासाठी शेतकरी आणि नाग दोघेही पडले विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे. दुर्दैवाने या घटनेमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण नागाने आपला जीव वाचवण्यासाठी चक्क शेतकऱ्याच्या मृतदेहाचा आसरा घेतला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील जिरग्याळ येथे 2 आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मग मृतदेह काढण्यासाठी गेलेल्यांची पाया खालची वाळू घसरली. कारण तरंगणाऱ्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसला होता,त्यामुळे मृतदेह काढायचा कसा ? असा पेच निर्माण झाला होता. अखेर सर्प मित्रांनी रेस्क्यू ऑपरेशन करत आधी नागाला मग मृत शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला.

अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील जिरग्याळ या ठिकाणी दोन आठवड्यापूर्वी रवींद्र संकपाळ शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेला होता. रात्रीच्या सुमारास पाणी पाजत असताना विहिरीमध्ये पडून रवींद्र संकपाळ यांचा मृत्यू झाला. 3 दिवसानंतर संकपाळ यांचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असल्याचे आढळून आलं. खोल असणाऱ्या विहिरीत उतरण्याची कोणतीच सोय नसल्याने मृतदेह बाहेर कसा काढायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. मग मोठ्या संख्येने गावकरी विहिरीजवळ जमले. मृतदेह काढण्यासाठी खटाटोप सुरू होता. पण या ठिकाणी मृतदेहाच्या अंगावर एक नाग फणा काढून बसल्याची बाब समोर येताच सगळ्यांच्याच पायाखालची वाळू घसरली.

पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण पाण्यात पडलेले नाग आपला जीव वाचवण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या अंगावर बसून होता. त्यामुळे विहिरीमध्ये उतरण्यासाठी कोणीच धजावत नव्हतं, अखेर सर्पमित्र असणाऱ्या रोहन शेलार आणि मोहसिन शेख यांना पाचारण करण्यात आलं. यानंतर दोघा सर्प मित्रांनी नागाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. अत्यंत धाडसाने या दोघा सर्प मित्रांनी विहिरीमध्ये उतरून मृतदेहाच्या अंगावर फणा काढून बसलेल्या नागाला अलगदपणे उचलून घेतलं,आणि त्यानंतर त्याला पकडून विहिरीच्या बाहेर काढत निसर्गाच्या अधिवासात सोडून दिलं आहे.

दरम्यान, नागाला विहिरीतून रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल चांगलाचा व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Sangali