जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'तुला जिवंत सोडत नाही...', पैसे मागणाऱ्या डेअरी चालकावर शेजाऱ्याकडून जीवघेणा हल्ला

'तुला जिवंत सोडत नाही...', पैसे मागणाऱ्या डेअरी चालकावर शेजाऱ्याकडून जीवघेणा हल्ला

'तुला जिवंत सोडत नाही...', पैसे मागणाऱ्या डेअरी चालकावर शेजाऱ्याकडून जीवघेणा हल्ला

काही दिवसांपूर्वी डेअरी चालकाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या सुभाष मोटेला ३ लाख रुपये उसने दिले होते. यातून त्याला गाई घ्यायच्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली : उसने पैसे घेण्यासाठी पुढे येतात पण ते पैसे द्यायची वेळ आली की पाठ फिरवून जातात असं अनेक ठिकाणी पाहायला मिळत. घेतलेले उसने पैसे परत करण्याची सतत मागणी करणाऱ्या डेअर चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याला स्वत:चे पैसे मागणं महागात पडलं. नेमकं काय प्रकरण? काही दिवसांपूर्वी डेअरी चालकाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या सुभाष मोटेला ३ लाख रुपये उसने दिले होते. यातून त्याला गाई घ्यायच्या होत्या. त्यापैकी २ लाख ७५ हजार त्याने डेअरी चालकाला परत केले. मात्र २५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ करत होता. १८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा डेअर चालक घरी जात असताना सुभाषने त्याला गाठलं आणि दुचाकीवरून जाऊया असं सांगितलं. दोघंही दुचाकीवरून जाण्यासाठी तयार झाले. दोघंही येळवी रोडवरून जात असताना लघुशंकेसाठी सुभाषने गाडी थांबवली. त्यावेळी डेअरी चालक बेसावध आहे हे पाहून त्याच्या डोक्यावर वार केला. दोघांमध्ये यावेळी वादही झाल्याची माहिती मिळाली आहे. तर आरोपीला डेअरी चालकाने हाताने चावा घेतला. घाबरलेला सुभाष यावेळी तिथून पळून गेला. जाताना त्याने डेअरी चालकाकडील पैसेही चोरून नेले. या झटापटीमध्ये मोबाईलही हरवल्याचं सांगण्यात आलं आहे. कुठे घडली घटना आरोपी सुभाषने शिवीगाळ करून तुला जिवंत सोडत नाही तुला कायमचं संपवतो अशी धमकीही दिली. या प्रकरणी आरोपी सुभाष मोटेवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेअरी चालक हृतीक गायकवाड याने पोलिसांना फिर्याद दिली. घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि धमकीही दिल्याची तक्रार केली. ही धक्कादायक घटना सांगली इथल्या पारे परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात