मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes सह वजन कमी करण्यासाठी 'मल्टीग्रेन आटा' आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या तयार करण्याची प्रक्रिया

Diabetes सह वजन कमी करण्यासाठी 'मल्टीग्रेन आटा' आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या तयार करण्याची प्रक्रिया

health Benefits of Multigrain Flour: अनेक धान्ये एकत्र मिसळून त्यापासून मल्टीग्रेन पीठ तयार केलं (Multigrain Flour control diabetes) तर त्यातील पोषक घटकांचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे मधुमेहालाही प्रतिबंध होतो.

health Benefits of Multigrain Flour: अनेक धान्ये एकत्र मिसळून त्यापासून मल्टीग्रेन पीठ तयार केलं (Multigrain Flour control diabetes) तर त्यातील पोषक घटकांचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे मधुमेहालाही प्रतिबंध होतो.

health Benefits of Multigrain Flour: अनेक धान्ये एकत्र मिसळून त्यापासून मल्टीग्रेन पीठ तयार केलं (Multigrain Flour control diabetes) तर त्यातील पोषक घटकांचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे मधुमेहालाही प्रतिबंध होतो.

मुंबई, 1 नोव्हेंबर : मल्टीग्रेन पीठ म्हणजे काय? तर नावाप्रमाणंच हे अनेक धान्यांपासून बनवलेलं पीठ असतं. एका धान्यामध्ये दुसऱ्या धान्याचे मिश्रण करून तयार केलेल्या पीठाला 'मल्टीग्रेन पीठ' (Multigrain Flour) किंवा 'एकत्रित पीठ' म्हणतात. गहू, तांदूळ, मका, बाजरी यासारख्या धान्यांशिवाय आपण खाण्याची कल्पनाही करू शकत नाही. या गोष्टी प्रामुख्याने आपल्या जगण्याचा आधार आहेत. यातून आपल्या शरीराला सर्वात जास्त पोषक तत्वे मिळतात. अनेक धान्ये एकत्र मिसळून त्यापासून मल्टीग्रेन पीठ तयार केलं (Multigrain Flour control diabetes) तर त्यातील पोषक घटकांचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे मधुमेहालाही प्रतिबंध होतो.

टाइम्सनाऊ न्यूजच्या बातमीनुसार, जेव्हा स्वादुपिंड शरीरात कमी काम करू लागते, म्हणजेच त्यातून कमी इन्सुलिन तयार होते, तेव्हा शरीरातील साखरेचे संश्लेषण कमी होऊ लागते. त्यामुळे रक्तात साखर जमा होऊ लागते, ज्यामुळे मधुमेहाचा आजार होतो. एका प्रकारच्या पिठात फायबरचे प्रमाण कमी असते. फायबर साखर रक्तात जाण्यापासून रोखण्यास मदत करते, म्हणून जेव्हा आपण अनेक धान्य एकत्र मिसळतो आणि त्यापासून मल्टीग्रेन पीठ तयार करतो तेव्हा त्यातील फायबरचे प्रमाण वाढते. यामुळेच मधुमेहींसाठी मल्टीग्रेन पीठ फायदेशीर आहे.

मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा

बहुतेक भारतीय त्यांच्या आहारात गव्हाच्या पिठाची रोटी खाण्यास प्राधान्य देतात. गव्हाचे पीठ खायला चविष्ट असते, त्यामुळे बहुतेक लोक या पिठाची चपाती खातात, परंतु इतर धान्यांच्या तुलनेत गव्हाच्या पिठात पोषक तत्वे खूप कमी असतात. ज्वारी, बाजरी, मका वगैरे गव्हामध्ये मिसळले तर ते मल्टीग्रेन बनते आणि दळून घेतल्यास ते मल्टीग्रेन पीठ बनते. पिठात आणखी काही धान्य मिसळले तर त्याची पौष्टिकता वाढते आणि त्याचा आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होतो.जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर मल्टीग्रेन पीठ खाणे फायदेशीर आहे.

हे वाचा - न्यूझीलंडकडून हरल्यानंतरही Team Indiaला आहे सेमी फायनलचा चान्स, वाचा काय आहे समीकरण?

मल्टीग्रेन पिठाचे फायदे

रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध

सामान्य पिठाच्या तुलनेत, मल्टीग्रेन पिठात अधिक आहारातील फायबर असते जे रक्तातील साखरेचे उत्सर्जन कमी करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. साखरेच्या रुग्णांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते.

हे वाचा - घरातून विचित्र आवाज येत असल्यानं सर्पमित्राला बोलावलं; सत्य समोर येताच शरमली महिला

पचनशक्ती राखते

मल्टीग्रेन पीठ पचनास मदत करते. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचन व्यवस्थित ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते. तसेच पोषक द्रव्ये शोषण्यास मदत होते.लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते, मल्टीग्रेन पिठात फारच कमी फॅट किंवा कोलेस्टेरॉल आढळत असल्याने ते लठ्ठपणावरही नियंत्रण ठेवते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी गव्हाच्या पिठाच्या ऐवजी हरभरा, ज्वारी, बाजरी अशा विविध धान्यांपासून बनवलेल्या रोट्यांचाच वापर करावा. यामध्ये असलेल्या फायबरमुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि जर तुमचे पोट भरले असेल तर तुम्ही जास्त खाणे टाळा.

First published:

Tags: Health Tips, Superfood