मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्यात समाजकंटकांनी फाडले संभाजीराजेंचं बॅनर, उदयनराजेंनी केले होते उद्घाटन

साताऱ्यात समाजकंटकांनी फाडले संभाजीराजेंचं बॅनर, उदयनराजेंनी केले होते उद्घाटन

छत्रपती संभाजीराजे भोसले नावाचा भुयारी मार्गावरील फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले नावाचा भुयारी मार्गावरील फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले नावाचा भुयारी मार्गावरील फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

सातारा, 09 जानेवारी : औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण संभाजीनगर करावे हा वाद पेटलेला असताना साताऱ्यात (Satara) संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या नावाचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

सातारा शहरातील ग्रेड सेपरेटच्या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी   छत्रपती संभाजीराजे भोसले नावाचा भुयारी मार्गावरील फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीच उदयनराजे भोसले यांनी भुयारी मार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

सारा-अनन्याला विसराल! संजय कपूरच्या मुलीचं हे Bold Photoshoot पाहिलं का?

सातारा शहरात ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते. 66 कोटी रुपये खर्चून हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी मदत मिळणार आहे.

दरम्यान, यावेळी  पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

'एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल तर प्रत्येकाने आपली सविस्तर भूमिका मांडली पाहिजे. पण  नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे पूर्वज आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा इतिहास वाचावा. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून बघितलं नाही तर त्याच्या कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ओळखत होते' असं उदयनराजे म्हणाले.

'अनेक ठिकाणी आपण पाहतो की जुन्या शहरांची नाव बदलण्यात आली आहे.  ज्याप्रमाणे बाँबे शहराचे मुंबई झालं त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेले औरंगाबाद शहराचे नाव बदलायचे असेल तर लोकशाही नुसार लोक निर्णय घेतील', अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

First published: