सारा-अनन्याला विसराल! संजय कपूरच्या मुलीचं हे Bold Photoshoot पाहिलं का?
अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) याची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कॅमेऱ्यापाससून दूर असली तरीदेखील सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंची चर्चा नेहमीच असते.


अभिनेता संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासाठी ती सध्या जोरदार तयारी करत असून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच ही स्टारकिड सोशल मीडियावर चर्चेत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


शनायाने गेल्याच वर्षी फॅशन विश्वात पदार्पण केलं आहे. नुकतेच तिने एक फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसुन येत आहे. मेकअप आर्टिस्ट रिद्धिमा शर्मा हिने शनाया हिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


स्टारकिड असूनही शनाया (Shanaya Kapoor) कॅमेरापासून सहसा दूरच असते. परंतु नुकतीच ती नेटफ्लिक्सच्या "The Fabulous Lives of Bollywood Wives या कार्यक्रमात तिची आई महिप कपूर (Maheep Kapoor) बरोबर दिसली होती. या फोटोमध्ये शनाया काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसून येत असून खूपच हॉट अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


या फोटोमध्ये ती फिकट आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या फोटोत देखील ती खूपच ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


हा ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा ड्रेस तिने खूप ट्रेंडी पद्धतीने परिधान केला आहे. शनाया कॅमेऱ्यापाससून दूर असली तरीदेखील सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंची चर्चा नेहमीच असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)