मुंबई, 13 जून : राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. यादरम्यान लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र बळीराजा यादरम्यानही काम करीत होता. तो थांबून चालणार नाही. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुकवरुन एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.
स्वत:च्या शेतातून घरी येत असताना वाटेत शेतकऱ्याचे एक कुटुंब शेतात पेरणी करत असताना त्यांना दिसले. त्या ठिकाणाहून गाडी पुढे गेली होती. मात्र संभाजीराजांना रहावलं नाही. त्यांनी गाडी वळवली आणि त्या शेतात गेले. सुरुवातील त्यांना संकोच वाटल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र ते पुढे गेले व त्यांनी शेतकऱ्यासह तिफन हाती घेतलं. हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणतात-
शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.(अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही.
मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे.
हे वाचा-चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराचा संशय
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे