इस्लामाबाद, 13 जून : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. भारत, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय पाकिस्तानवरही कोरोनाचं संकट आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही कोरोनाव्हायरसचा फटका बसला आहे. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. गुरुवारपासून त्याची तब्येत बिघडली होती, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून आफ्रिदी पाकिस्तानमधील गरीब आणि गरजू लोकांना सतत मदत करीत होते. ते आपल्या टीमसह पाकिस्तानच्या विविध भागात दैंनदिन जीवनासाठी आवश्यक साहित्य पुरवित होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती पुरवली आहे.
I’ve been feeling unwell since Thursday; my body had been aching badly. I’ve been tested and unfortunately I’m covid positive. Need prayers for a speedy recovery, InshaAllah #COVID19#pandemic#hopenotout#staysafe#stayhome
शाहिद आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'गुरुवारपासून माझी तब्येत ठीक नव्हती. माझं शरीरात खूप वेदना होत होत्या. त्यानंतर मी कोरोना टेस्ट केली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी लवकरात लवकर यातून बरा होवो यासाठी तुम्ही सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करा.