मुंबई, 06 जुलै : केजीएफ आणि केजीएफ 2च्या दमदार यशानंतर दिग्दर्शक प्रशांत नील यांचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. ‘सालार’ असं सिनेमाचं नाव असून अभिनेता प्रभास या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरमधून प्रभास फुल ऑन अँक्शन मोडमध्ये दिसत आहे. 6 जुलै रोजी अगदी पहाटेच सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. प्रभास आणि सालार सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. सिनेमात मोठी स्टार कास्ट देखील पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी प्रभाससह इतर कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे? पाहूयात. अभिनेता प्रभासचा आदिपुरूष हा सिनेमा काही दिवसांआधी प्रदर्शित झाला. सिनेमात प्रभासने प्रभू श्रीराम चंद्रांची प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे प्रभास चांगलाच ट्रोल देखील झाला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जरी कमाई केली असली प्रेक्षकांच्या नजरेच सिनेमा सप्शेल फेल ठरला. बाहुबली सिनेमानंतर प्रभासचे सगळेच सिनेमे फ्लॉप ठरले. बाहुबलीमुळे प्रभासचं करिअर वरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलं पण त्यानंतर काही वर्षात त्याचा करिअर ग्राफ घसरत गेला आहे. त्याच्या हाती नवे सिनेमे येत असले तरी बॉक्स ऑफिसवर सिनेमा फार काळ टिकून राहू शकत नाहीये. दरम्यान आता या सगळ्यातून प्रभासला तारण्यासाठी सालार हा सिनेमा येऊन घातला आहे. या सिनेमासाठीही प्रभासने तगडं मानधन घेतलं आहे. हेही वाचा - राम चरण-अल्लू अर्जुन सोडा, आपल्या बॉलिवूड कलाकारांकडेही आहे प्रायव्हेट जेट, किंमती ऐकून हैराण व्हाल बाहुबली फेम अभिनेता प्रभासने सालारसाठी तगडी फी घेतल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासने सिनेमासाठी 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्याचप्रमाणे सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शमधील 10 टक्के भाग देखील प्रभासच्या पदरी पडणार आहे.
अभिनेत्री श्रृती हसनचं हिने सिनेमासाठी 8 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सिनेमात श्रृती प्रभासबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन सालार सिनेमात वर्धाराज मन्नारच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा पहिला लुक समोर आला आहे. पृथ्वीराजने सिनेमासाठी 4 कोटी मानधन घेतलं आहे. मानधनावरून सिनेमात पृथ्वीराजची छोटी भूमिका असेल असा अंदाज लावण्यात येत आहे.
अभिनेते जगपति बाबू हे साऊथ सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. सिनेमात ते दमदार भूमिकेत दिसणार आहे. सिनेमासाठी त्यांनी 4 कोटी मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.