बापरे, दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली होती सेफ्टी पिन!

नाक साफ करण्यासाठी बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली होती. मात्र, अनावधानाने ती पिन नाकातून घशात आणि ...

नाक साफ करण्यासाठी बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली होती. मात्र, अनावधानाने ती पिन नाकातून घशात आणि ...

  • Share this:
    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 26 डिसेंबर : एका दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत सेफ्टी पिन अडकल्याची धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. सुदैवाने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर ही सेफ्टी पिन बाहेर काढली आहे. रियांश मडावी असं या चिमुकल्या मुलाचं नाव आहे. मडावी कुटुंब वरोरा शहरातील निवासी आहे.  नाक साफ करण्यासाठी बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली होती. मात्र, अनावधानाने ती पिन नाकातून घशात आणि घशातून श्वसननलिकेत गेली आणि बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मामू टेंशन नहीं लेनें का ! 'मुन्नाभाई 3' च्या प्रदर्शनाबद्दल अर्शद वारसीचा मोठा त्यामुळे मडावी यांनी तातडीने बाळाला  चंद्रपूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बाळाच्या आरोग्य तपासण्या केल्यानंतर  ब्रॉनकोस्कोपी (Broncoscopy) करून ही पिन काढण्याचे ठरले. त्यानंतर इएनटी तज्ञ डॉ. मनीष मुंदडा यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून अखेर बाळाच्या श्वसनलिकेत अडकलेली सेफ्टी पिन बाहेर काढली. . श्वसननलिकेत अडकलेली ही सेफ्टी पिन बाळाच्या जीवासाठी धोकादायक ठरली असती. मात्र डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक ब्रॉनकोस्कोपीच्या माध्यमातून ही सेफ्टी पिन बाहेर काढली. जीवाशी आलेल्या या प्रसंगातून बाळ सुखरूप बचावले असले तरी डॉक्टरांनी लहान मुलांच्या कान-नाक-घश्यात अशा वस्तू न टाकण्याचे आवाहन केले आहे. कुरकुरे खाण्यासाठी 5 रुपये दिले नाही म्हणून मुलाने सोडले घर ! दरम्यान, आईने कुरकुरे घेण्यासाठी 5 रुपये दिले नाही म्हणून 8 वर्षांच्या मुलाने घर सोडून गेल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे.   आठ वर्षांच्या चिमुरडा आईसोबत दुकानात गेल्यावर या ना त्या गोष्टी मागत होता. शुक्रवारी त्याने आईकडे 5 रुपयांचे कुरकुरे मागितले. पण त्याच्या आईने त्याला कुरकुरे खाण्यासाठी 5 रुपये काही दिले नाही. आईने आपल्याला 5 रुपये दिले नाही, याचा राग मुलाला अनावर झाला. त्याने शाळेचे दफ्तर पाठीला लावले आणि सायकल घेऊन घराबाहेर पडला. .म्हणून भारतात तयार करण्यात आलेल्या 'या' मॅराडोना केकवर भडकले फॅन्स! घरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर त्याने रेल्वेची रूळ गाठला. त्यानंतर तो रुळावरून चालत गेला. त्यावेळी रेल्वे रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन या मुलाला  रेल्वे रुळापासून सायकल सहित बाजूला केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
    Published by:sachin Salve
    First published: