मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सगळ्यांना भाजपचा पराभव करायचा होता पण...', सामनाच्या अग्रलेखात मोदींचं कौतुक

'सगळ्यांना भाजपचा पराभव करायचा होता पण...', सामनाच्या अग्रलेखात मोदींचं कौतुक

गुजरात विजयाचा जल्लोष भाजप नेते करत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश गमावलं त्यावर कुणीच बोलत नाही, असे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

गुजरात विजयाचा जल्लोष भाजप नेते करत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश गमावलं त्यावर कुणीच बोलत नाही, असे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

गुजरात विजयाचा जल्लोष भाजप नेते करत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश गमावलं त्यावर कुणीच बोलत नाही, असे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 09 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (शुक्रवार, 08 डिसेंबर) लागले. यात गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला तर हिमाचलमध्ये त्यांनी सत्ता गमावली. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून गुजरातमधील विजयाचं श्रेय फक्त मोदींचेच असल्याचं म्हटलं. तर दुसऱ्या बाजूला हिमाचलमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी तिथे ते आमदार फोडू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असून नैतिक, अनैतिक हे शब्द निरर्थक असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. गुजरात विजयाचा जल्लोष भाजप नेते करत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश गमावलं त्यावर कुणीच बोलत नाही, असे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

देशात तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या व निकाल लागून विजयाचे उत्सव पार पडले. गुजरात विधानसभा निवडणुकांचे काय निकाल लागणार, यावर अजिबात चर्चा करण्याची गरज नव्हती. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विजय झाला आहे. ‘‘आजचा गुजरात मी बनवला आहे, हे गुजरात माझे आहे,’’ असा प्रचार पंतप्रधान मोदी यांनी केला व गुजराती जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते व या काळात गुजरातने प्रगती केली. पंतप्रधान म्हणूनही मोदी यांनी गुजरातकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त मोदी यांनाच द्यायला हवे. गुजराती मनावर मोदीची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा : उदयनराजे भोसले आक्रमक, तक्रार घेऊन थेट पंतप्रधान कार्यालयातच जाणार!

गुजरातमध्ये काँग्रेसची वाताहत झाली असल्याचं अग्रलेखात म्हटलंय. काँग्रेस किमान पन्नास जागांपर्यंत पोहोचेल व पराभवातही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काँग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. 1985 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आतापर्यंत कायम होता. यावेळी ‘149’ चा आकडा पार करू असे भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. तसा आकडा पार करून भाजपने नवा विक्रम निर्माण केला. भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो. हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल. गुजरातमध्ये भाजपच जिंकेल याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नव्हते.

मंत्रिमंडळ बदलाचा भाजपला फायदा

कोरोना काळात गुजरातमध्ये सर्वात जास्त हाहाकार माजला. इस्पितळांत जागा नव्हती. स्मशानात आप्तांचे मृतदेह घेऊन रांगा लागल्या होत्या. तरीही लोकांनी मोदींच्या पारडय़ात मते टाकली. हे त्यांच्या नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणेमुळे व पंतप्रधान असले तरी आपल्या गृहराज्याकडे बारीक लक्ष असल्यानेच घडले. निवडणुकीपूर्वी मोरबी पूल दुर्घटना घडली. दुःखाची लाट उसळली. पण त्या लाटेचा तडाखा मोदी लाटेस बसला नाही. कारण मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष आहेत. भूपेश पटेल हे मुख्यमंत्री म्हणून नवे होते. मंत्रिमंडळातून सर्व जुने चेहरे बदलून मोदी यांनी धक्का दिला. ती कोरी पाटी घेऊन मोदी निवडणुकीत उतरल्याचा फायदा झाला असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

हेही वाचा : पिंपरीच्या पाटलांनी पूर्ण केलं PM मोदींचं स्वप्न; गुजरात मिशन कसं उतरवलं सत्यात?

महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले

दुसरे म्हणजे, मोदी यांच्यामुळे गुजरात प्रगतीपथावर वेगाने पुढे जात आहे. अनेक जागतिक दर्जाचे सोहळे गुजरातमध्ये होत आहेत व जागतिक नेते साबरमती, अहमदाबादेत उतरतात ते मोदींमुळेच. महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरातेत याच काळात पळवून नेले गेले. त्याचाही फायदा निवडणुकीत झालाच आहे. गुजरातमध्ये गांधी किंवा सरदार पटेल यांचे भव्य पुतळे उभारले आहेत. पण मोदी हीच गुजरातची ओळख व अस्मिता आहे. गुजरातच्या मतदारांनी ते दाखवून दिले.

आप, एमआयएमने काँग्रेसचे नुकसान केले

‘आप’ व केजरीवाल यांनी गुजरातेत येऊन फक्त हवा केली. गुजरातेत पुढचे सरकार आमचेच अशी बतावणी केली. त्यांच्या सभांना गर्दी झाली. पण ‘आप’ने काँग्रेसची मते खाल्ली. मतविभागणी घडवून एक प्रकारे भाजपचा विजय सहज केला. अर्थात ‘आप’ नसती तरी भाजपच जिंकणार होता. पण काँग्रेसची स्थिती कदाचित इतकी बिघडली नसती. गुजरातमध्ये आप व ‘एमआयएम’ने भाजपचा पराभव करण्यापेक्षा काँग्रेसचे नुकसान केले हेसुद्धा नाकारता येणार नाही. सगळय़ांनाच भाजपचा पराभव करायचा होता, पण एकमेकांच्या पायात पाय अडकवून त्यांनी भाजपच्या विजयाचाच मार्ग मोकळा केला. अर्थात, भाजपने गुजरात जिंकले तरी राजधानी दिल्लीतील महानगरपालिका व हिमाचल प्रदेश हातचे गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभव ऐतिहासिकच म्हणावा लागेल.

हेही वाचा : 'एक टक्क्याने मागे पडलो, पण...', हिमाचलच्या पराभवावर मोदींची फर्स्ट रिएक्शन

दिल्ली, हिमाचलमध्ये मोदींची जादू का चालली नाही?

दिल्ली महानगरपालिकेत भाजपची 15 वर्षे सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात ‘आप’ला यश आले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व पंतप्रधान मोदींचे राजकारणाचे केंद्रस्थान आहे. येथे मोदींची जादू का चालू शकली नाही? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता होती. तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, पण त्यांचे आमदार पह्डून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजप असेल तर ते अनैतिक आहे. अर्थात भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता वगैरे शब्द निरर्थक आहेत. एकंदरीत गुजरात विजयाने भाजप जल्लोष करीत आहे. ते यश सर्वश्री मोदी यांचे आहे, पण दिल्ली व हिमाचल प्रदेश भाजपने गमावले त्यावर कोणीच बोलत नाही. असे का?

First published:

Tags: Aam aadmi party, AAP, BJP, Delhi, Gujarat, Gujrat Assembly Election, Himachal pradesh, Himachal Pradesh Assembly Election, Narendra modi, Shivsena