बब्बू शेख, चांदवड, 26 जुलै: रस्त्यांवर अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामध्ये कधी, कुठे, कसा अपघात घडेल याविषयी कोणी अंदाजही लावू शकत नाही. एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना घडत असतात. दिवसभरात असे अनेक अपघात घडतात यापैकी काहींचे फोटो, व्हिडीओही समोर येतात. सध्या बर्निंग कारचा थरार समोर आला आहे. यामध्ये धावत्या बीएमडब्ल्यूने पेट घेतलाय. धावत्या बीएमडब्ल्यू कार ने पेट घेतल्याची घटना चांदवडच्या राहूड घाटात मुंबई-आग्रा महामार्गांवर घडली. चालकाने तातडीने कार थांबवली. तो आणि इतर 2 जण तातडीने बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.
धावत्या बीएमडब्ल्यूने अचानक घेतला पेट, बर्निंग कारचा थरारक VIDEO #news18lokmat #viralvideo pic.twitter.com/MDuSxbptaD
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2023
कार मुंबई येथून धुळ्याला जात होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या घटनेमुळे काही काळ महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता बीएडब्ल्यू कार जळत आहे आणि अग्निशामक दल घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, चांडवड येथे मुंबई-आग्रा महामार्गांवर घडलेल्या या घडनेनं अनेकांनी धक्का बसला आहे. चालक आणि इतर दोन जण वेळीच कार मधून बाहेर पडल्यामुळे वाचला जीव. यापूर्वीही अशा बर्निग कारच्या थरारक घटना घडल्या आहेत.