सांगली, 14 जुलै: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) याठिकाणी एका चोराला जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. संबंधित चोरट्यानं एका महिल्याच्या गळ्यातील सोनं हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला गावातील लोकांनी पाठलाग करत पकडलं आहे. यानंतर गावातील काही संतप्त जमावानं चोरट्याचे हात बांधून त्याला काठीनं अन् लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (thief beaten by villagers) केली आहे. संबंधित घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावरील आहे. संबंधित चोरटा रस्त्यावरून पायी प्रवास करणाऱ्या महिलांचं सोनं हिसकावून पळ काढत होता. दरम्यान ग्रामस्थानी चोरट्याला पाठलाग करत त्याला बेदम चोप दिला आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक चोऱ्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या लोकांनी संबंधित चोराला टार्गेट बनवलं आहे. हेही वाचा- VIDEO: नागपुरात ज्वेलर्सवर दरोडा; लुटीचा थरार सीसीटीव्हीत कैद, पाहा धक्कादायक CCTV टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित चोरट्याचं नाव आकाश मारुती हाराळे उर्फ कांबळे असं असून तो मुळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांनी चोरट्याला पकडल्यानंतर, दुचाकीवर बसल्या ठिकाणी मारहाण केली. ग्रामस्थांनी काठीनं आणि लाथा बुक्क्यांनी पाठीवर आणि मानेवर बेदम फटके मारले आहे. यामुळे चोरटा जीवाच्या आकांतानं माफी मागत असल्याचंही संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.