नागपूर, 14 जुलै : नागपूरच्या जरीपटका (Jaripatka Nagpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा भीम चौकात एका ज्वेलर्सवर दरोडा (Robbery at Jewellers) टाकण्यात आला होता. ज्वेलर्स मालकाला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आले होते. दुकानात झालेल्या लुटीचा एक्सक्लुसिव्ह सीसीटीव्ही न्यूज18 लोकमतच्या (Robbery CCTV) हाती लागला आहे. या प्रकरणात चार पैकी दोन आरोपींना अटक करण्यात नागपूर पोलिसांना (Nagpur Police) यश आले होते. दोन आरोपी अजून ही फरार आहे.
5 जुलै रोजी दुपारी 3 वाजता तोंडावर कापड बांधून आलेल्या चार मोटारसायकलस्वारांनी अवनी ज्वेलर्समध्ये शिरून मालक मालक आशिष नावरे यांना बंदूकचा धाक दाखवत बंधक बनवले होते. यानंतर त्यांच्या दुकानातील 7 तोळे सोने, चांदी सह एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल लुटून पसार झाले होते.
नागपुरात ज्वेलर्सवर दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/EJbh9UtnwD
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2021
"नानांच्या 'मन की बात'ने राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?"
लुटुच्या दरम्यान आरोपीने मालक आशिषला मारहाण केली आणि आवाज होऊ नये तोंडावर पट्टी बांधून दुकान बंद केले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तो आता समोर आला आहे. लुटीतील वीरेंद्र यादव आणि दीपक त्रिपाठी या दोघांना मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे.
मध्यप्रदेशच्या कटणी भागातून अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी त्याच भागात मोटरसायकल सोडून पसार झाले, पोलीस त्यांचा देखील शोध घेत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीची प्रेयसी देखील आरोपी आहे, तिनेच दरोडेखोरांना टीप दिली होती. तिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.