• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मृत्यू पप्पा ना अधीच दिसला होता का ? आर. आर. आबांच्या मुलीची भावनिक पोस्ट

मृत्यू पप्पा ना अधीच दिसला होता का ? आर. आर. आबांच्या मुलीची भावनिक पोस्ट

R R Patil

R R Patil

सांगली जिल्ह्यातील अंजनीसारख्या खेडेगावातून आपले साम्राज्य निर्माण केलेल्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil)आपली ओळख गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण केली.

  • Share this:
    सांगली, 9 नोव्हेंबर: सर्वसामन्यांचा आवाच असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (R R Patil) यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेते आबांच्या आठवणींना आजही उजाळा देतात. आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटील-थोरात यांनी आबांच्या सोबतच्या घरातील शेवटच्या भेटीच्या आठवणीचा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. निधनाआधी चार महिने, म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी मुलांची शेवटची भेट घेतली होती,डोळ्यात पाणी आणुन आबांनी घेतलेली गळाभेट आणि ग्रामस्थांच्या सत्काराला आबांनी दिलेले उत्तर,स्मिता यांनी आपल्या आठवणीतुन समोर आणले आहे. माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी नेते स्वर्गीय आर.आर.(आबा ) पाटील यांचे अकाली जाणे खरंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चटका लावणारे होते.आजही आबांच्या आठवणी व उणीव भासत असल्याच्या गोष्टी अनेक वेळा समोर येतात.आणि अशीचं एक आठवण,जी त्यांच्या कुटुंबासोबतची आणि विशेषतः मुलींच्या सोबतंच समोर आली आहे. आबांच्या निधाना आधी चार महिन्यापूर्वी आबांची गावाला आणि घरासाठी ठरलेले शेवटची भेट,आबांची मोठी कन्या स्मिता पाटील-थोरात यांनी 8 नोव्हेंबर 2014 या दिवशीची ही आठवण 8 नोव्हेंबरच्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

    घरातील लिहलेली शेवटची आठवण..

    आज 8 नोव्हेंबर ...बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन ..! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले.काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय,असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते. 3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते.या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. 6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधुन सगळं गाव दोन - दोनदा फिरून बघितले.घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांन कडे बघुन जात असत.पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधुन वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणी ना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते.आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पाना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व प्पपा च्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पा नी आम्हाला शेवट चे खुशीत घेतले असावे त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती - शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणखी किती सत्कार करणार .. ?मृत्यु पप्पा ना अधीच दिस ला होता का ? अशा  शब्दात स्मिता पाटील -थोरात यांनी मुलींच्या आणि गावाच्या सोबत आबांच्या शेवटच्या आठवणीने उजाळा दिला आहे. रोहित पाटील यांनी ही पोस्ट शेअर आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published: