• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • वसई रेल्वे स्थानकावरचा थरारक VIDEO, मृत्यूच्या दाढेतून महिलेला वाचवलं पण...

वसई रेल्वे स्थानकावरचा थरारक VIDEO, मृत्यूच्या दाढेतून महिलेला वाचवलं पण...

रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 7 वर रेल्वे थांबली होती. त्यामुळे प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या.

रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 7 वर रेल्वे थांबली होती. त्यामुळे प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या.

रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 7 वर रेल्वे थांबली होती. त्यामुळे प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या.

  • Share this:
वसई, 20 सप्टेंबर : 'देव तारी त्याला कोण मारी', असं नेहमी म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती अनेक घटनांमध्ये आपल्या पाहण्यास मिळते. वसई रेल्वे स्थानकावर (Vasai Road Railway Station) अशीच एक घटना घडली. धावत्या रेल्वे (railway) चढताना पाय घसून महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली होती. पण, वेळीच देवदुताप्रमाणे रेल्वे पोलीस (railway police) मदतीला धावून आले आणि या महिलेचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई रेल्वे स्थानकावरप्लॅटफॉर्म क्र. 7 वर  शनिवारी ही घटना घडली होती.  प्रमिला मारू असं त्या महिला प्रवाशाचे नाव असून त्या हैद्राबाद येथे राहणाऱ्या आहेत. रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 7 वर रेल्वे थांबली होती. त्यामुळे प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या. मात्र ट्रेन चालू होताच ती पकडण्यासाठी त्या धावत गेल्या असता त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. धावत्या रेल्वेमुळे त्यांना जोराचा धक्का बसला आणि त्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात अडकल्या गेल्या. मात्र, त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांना बाहेर खेचून काढले. VIDEO : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. या घटनेत  महिलेच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, धावत्या रेल्वेत चढण्याचे धाडस करू नका, अशी वारंवार सूचना रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे. त्यातून प्रवाशी आपल्या जीवाची पर्वा न करता नको ते धाडस करता आणि जीवाला मुकतात. त्यामुळे असा कोणताही प्रसंग घडला तरी धावत्या रेल्वे चढू नका, असं आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published: