• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लज्जास्पद Video : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण

लज्जास्पद Video : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण

या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  बंगळुरू, 19 सप्टेंबर : बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) रविवारी बँकेच्या (Bank) दोन अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या आरोपाखाली दोन मुस्लीम तरुणांना (Muslim Youths) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँकेत काम करणारी एक 35 वर्षीय महिलेला घरी जाण्यासाठी उशीर झाला होता. ज्यामुळे तिने आपल्या सहकर्मचाऱ्याला घरी सोडण्याची विनंती केली. रात्री साधारण 9.20 वाजता दोघे बाईकवरुन जात होते, तेव्हा मागून आलेल्या दोन तरुणांना त्यांना थांबवलं आणि मारहाण सुरू केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on social Media) व्हायरल होत आहे. (Shameful video Hindu bank officer beaten for leaving Muslim woman colleague at home) बाईकच्या मागच्या सीटवर एक महिला बसली होती. ती मुस्लीम असल्याचं तिच्या पेहरावावरुन दिसत होतं. तिने बुरखा घातला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे दोन्ही तरुण मुस्लीम समुदायाते होते. दोघांनी आधी बँक अधिकाऱ्याच्या बाईकच्या समोर आपली गाडी उभी करून त्यांना अडवलं आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू केली. हे ही वाचा-अंगात भूत संचारलंय म्हणत पुजाऱ्याने केली महिलेला मंदिरात अमानुष मारहाण, VIDEO दोन्ही तरुणांना महिलेने सहकाऱ्यासोबत बाईकवर बसून जाण्यास आक्षेप घेता. महिलेने दोन्ही तरुणांना सांगितलं की, ती आपल्या सहकाऱ्यासोबत घरी येत आहे. त्यांना याबद्दल काही आक्षेप नाही. यानंतर तरुणांनी महिलेच्या पतीचा नंबर घेतला आणि त्याला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलेच्या पतीला फोन करून सांगितलं की, ती एका हिंदू पुरुषासोबत बसली आहे. यावर महिलेच्या पतीला सांगितलं की, त्याला याबाबत माहीत आहे आणि ती महिलेच्या सहकाऱ्यालाही ओळखतो. मात्र तरीही त्या तरुणांनी महिलेला जबरदस्तीने बाईकवरुन उतरवलं आणि ऑटो बुक करून घरी पाठवलं. यादरम्यान तरुणांनी महिलेच्या सहकाऱ्यांला शिव्या दिला आणि मारहाणदेखील केली. यासर्व घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: