जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rohit Pawar tweet : संजय राऊतांना जामीन पण रोहित पवारांच्या ट्वीटची चर्चा, व्हिडीओत असे आहे तरी काय?

Rohit Pawar tweet : संजय राऊतांना जामीन पण रोहित पवारांच्या ट्वीटची चर्चा, व्हिडीओत असे आहे तरी काय?

Rohit Pawar tweet : संजय राऊतांना जामीन पण रोहित पवारांच्या ट्वीटची चर्चा, व्हिडीओत असे आहे तरी काय?

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 नोव्हेंबर : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय दिला. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.

जाहिरात

दरम्यान राऊत बाहेर येताच राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासा सुरूवात केली. याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राऊतांना जामीन मिळताच एक जबरदस्त व्हिडिओ ट्विट केला आहे. सध्या या ट्वीटचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा :  LIVE Updates : संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

शिवसेनेतील बंडखोरीनंतर अवघ्या काही दिवसांत संजय राऊत यांनी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर  ठाकरे गटाची भूमिका ठाम पणे मांडणारा प्रभावी वक्ता नसल्याची चर्चा होती. मात्र, आता राऊत तुरुंगातून बाहेर आल्यास ते पुन्हा ठाकरेंची मशाल पेटवणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाविरोधात जनतेसमोर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या याच आक्रमक बाण्याचा धागा पकडत रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.

जाहिरात

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत एक पिंजरा दिसत असून त्यातून एक वाघ बाहेर येतानाचे दिसत आहे. पिंजऱ्यातून वाघ बाहेर आला, अशा आशयाचं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवारांच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. तर, अनेकांनी त्यांच्या या आयडियाचे कौतुक केलं आहे. रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट करत सत्यमेव जयते असे लिहले आहे. तर, संजय राऊत यांना टॅगदेखील केलं आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  BREAKING: ED ला न्यायालयाचा धक्का, संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

सुप्रिया सुळें यांनीही संजय राऊत बाहेर येताच केलं ट्वीट

गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडित आहेत. आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. कथित प्रत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांशी बोलताना सत्यमेव जयते अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात