Home /News /maharashtra /

माजी मंत्री राम शिंदेंना रोहित पवारांकडून पुन्हा धक्का, नगराध्यक्षासह 10 नगरसेवक राष्ट्रवादीत 

माजी मंत्री राम शिंदेंना रोहित पवारांकडून पुन्हा धक्का, नगराध्यक्षासह 10 नगरसेवक राष्ट्रवादीत 

मतदारसंघातील सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने राम शिंदे अडचणीत आले आहेत.

अहमदनगर, 15 जून : भाजप नेते आणि माजी कॅबिनेटमंत्री राम शिंदे यांना दुसरा मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मतदारसंघातील सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने राम शिंदे अडचणीत आले आहेत. नगरपरिषदेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार  आहेत. अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का देत जामखेड येथील भाजपचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह 10 विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  त्यामुळे हा भाजपाला आणि माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का मानला जात आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या विधानसभा निवडणूक पराभवानंतर भाजपला कर्जत-जामखेड मतदारसंघात हा मोठा धक्का आहे. हेही वाचा - पहिली- दुसरीचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण आदेश; इतक्यात सुरू होणार नाहीत या शाळा दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या राम शिंदे यांच्या पारंपरिक मतदारंसघात जात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. या निवडणुकीत बाहेरचा विरुद्ध स्थानिक असाही वाद रंगला होता. मात्र अशा स्थितीतही रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव करत विजय खेचून आणला होता. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ram shinde, Rohit pawar

पुढील बातम्या