पहिली- दुसरीचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण आदेश; इतक्यात सुरू होणार नाहीत या शाळा

पहिली- दुसरीचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण आदेश; इतक्यात सुरू होणार नाहीत या शाळा

शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे. त्यानुसार पुढच्या महिन्यात नववीपासून पुढचे वर्ग सुरू होतील. पण सगळ्या शाळा जुलैपासून सुरू होणार नाहीत. कशा असतील कोरोनाकाळातल्या शाळा.. वाचा सविस्तर नियमावली

  • Share this:

मुंबई, 15 जून : शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे. त्यानुसार पुढच्या महिन्यात नववीपासून पुढचे वर्ग सुरू होतील. पण लहान मुलांच्या शाळेबद्दल मोठा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.

पहिली, दुसरी आणि पूर्वप्राथमिक शाळा इतक्यात सुरू होणार नाहीत. शाळा समिती याविषयी निर्णय घेईल. या वर्गातल्या मुलांसाठी ऑनलाइन वर्गही घेऊ नयेत. त्याऐवजी टीव्ही, रेडिओवरच्या कार्यक्रमातून घरीच शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावं, असं सरकारी आदेश सांगतो.

तिसरी ते पाचवीची शाळा सप्टेंबरमध्ये सुरू होईल. सहावी ते आठवी ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंटेन्मेंट झोनमधल्या शाळा इतक्यात सुरू होणार नाहीत. अशा शाळा सुरू करण्याची तारीख निश्चित झालेली नाही. त्या त्या महापालिका, जिल्हा परिषदांचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, 'या' राज्याने घेतला निर्णय

शाळेत सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी शाळा शिफ्टमध्ये चालवाव्यात. एक शिफ्ट जास्तीत जास्त तीन तासांची ठेवावी. किंवा वेगवेगळ्या वर्गातल्या मुलांनी एक दिवसाआड शाळेत यावं. म्हणजे वर्ग पूर्ण क्षमतेने न भरता अंतर ठेवून शाळा सुरू करता येईल. आजारी मुलांना शाळेत पाठवू नये. पहिली दुसरीच्या मुलांचा पालकांनी घरीच अभ्यास घ्यावा, अशी पालकांचीही जबाबदारी सरकारी आदेशात नमूद करण्यात आली आहे.

...म्हणून लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

First published: June 15, 2020, 6:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading