जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana News : पुण्याहून निघालेल्या ST चा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू; भीषण अपघाताचे पाहा PHOTO

Buldhana News : पुण्याहून निघालेल्या ST चा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू; भीषण अपघाताचे पाहा PHOTO

बुलडाणा अपघात

बुलडाणा अपघात

सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ Buldana,Buldana,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंडारे प्रतिनिधी बुलढाणा : पुण्याहून निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस पुण्याहून बुलडाण्याच्या दिशेनं निघाली होती. पळसखेड चक्का गावाजवळ एसटी बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रस्त्यावर वाकडी तिकडी गाडी चालवत होते तरुण; पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक, पाहा Video

सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १० ते १५ जण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा चमत्कार की आणखी काही? अपघातात कारचा चुरा, तरी तरुणाला काहीच झालं नाही, पाहा Video
News18लोकमत
News18लोकमत

बस पुण्याहून मेहकर इथे जात होती. कंटेनर आडवा आल्याने बसची कंटेनरवर जोरदार धडक झाली आणि बसचा पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी गावकऱ्यांनी रुग्णालयात केले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात