जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर वाकडी तिकडी गाडी चालवत होते तरुण; पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक, पाहा Video

रस्त्यावर वाकडी तिकडी गाडी चालवत होते तरुण; पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक, पाहा Video

रस्त्यावर मजा मस्ती करणं तरुणांच्या अंगलट

रस्त्यावर मजा मस्ती करणं तरुणांच्या अंगलट

सोशल मीडियावर लोक प्रसिद्धीसाठी अनेक हटके गोष्टी करतात. कायमच चर्चेत राहण्यासाठी ते रोज काही ना काही विचित्र, मजेशीर, गोष्टी शेअर करत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मे : सोशल मीडियावर लोक प्रसिद्धीसाठी अनेक हटके गोष्टी करतात. कायमच चर्चेत राहण्यासाठी ते रोज काही ना काही विचित्र, मजेशीर, गोष्टी शेअर करत असतात. मात्र इतरांपेक्षा वेगळं करण्याच्या नादात अनेकांसोबत धक्कादायक घटनाही घडतात. त्यांचा स्टंट त्यांच्याच अंगलट येतो. यामध्ये भर पडली असून आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुणांची फजिती झाली. रस्त्यावर पहिलेच अपघाताचे प्रकार वाढताना दिसत आहेत. त्यात तरुणांचे स्टंट काही थांबायचं नाव घेईना. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरुणाने गाडी विचित्र पद्धीतीनं चालवल्यामुळे त्यांचं फळही त्याला लगेच भेटलं. हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा गाडी चालवत आहे. त्याच्या मागे आणखी दोन मुले बसलीयेत. तो गाडी फुल स्पीडने चालवत असून तो वळणावळणाने गाडी चालवत आहे. सापासारखं वाकडं तिकडं होत तो भरधाव वेगाने गाडी पळवत आहे. तेवढ्याच पुढच्याच क्षणी त्यांच्यासोबत नको ते घडलं. मुलांची गाडी दुभाजराला जाऊन धडकते आणि तिघेही वाईटरित्या रस्त्यावर पडतात.

जाहिरात

@NehaAgarwal_97 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 11 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर खूप कमेंट येताना दिसत आहे. हा भयानक अपघात शेअर करत वापरकर्त्याने लिहिलं, ‘अजून रस्त्यावर मस्ती करा’. दरम्यान, हा अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावू शकतो की या अपघातात तरुणांना किती मार बसला असेल. यापूर्वीही असे अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. रस्त्यावर मजा मस्ती करण्याच्या नादात लोक आपल्या जीवाशीही खेळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात