जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रत्नागिरी : हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा उलटली, भयानक अपघात

रत्नागिरी : हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा उलटली, भयानक अपघात

रत्नागिरी : हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा उलटली, भयानक अपघात

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक भीषण अपघात झाला आहे.

  • -MIN READ Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 22 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत आहेत. आजच समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक भीषण अपघात झाला आहे. हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा पालटली. या अपघातात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील सर्व जखमी महिलांना कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक हा भीषण अपघात झाला आहे.  हेही वाचा -  यवतमाळ : खाद्य तेलाचा टँकर पलटी झाला, अन् नागरिकांनी केलं भलतंच पाहा VIDEO

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आता आणखी एक भीषण अपघात या महामार्गावर झाला आहे. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. धामणगाव रेल्वे तालुका परिसरात हा अपघात झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार डिव्हायडरला धडकल्याचा  प्राथमीक अंदाज वर्तवण्यात  येत आहे. आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर एका कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारची मागची आणि पुढची बाजू पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या कारची अवस्था पाहूनच या भीषण अपघाताची कल्पना येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात