मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जन्मदात्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, नवी मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO

जन्मदात्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, नवी मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO

गोळीबारात जखमी झालेल्या विजयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या विजयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या विजयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी मुंबई, 15 जून: गाडी सर्विसला (bike servicing) देण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या गोळीबारात त्यांचा दोन नंबरचा मुलगा विजय ज्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी मुंबईतील ऐरोली भागात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. निवृत्त पोलीस कर्मचारी (retired police officer) भगवान पाटील असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्याने गोळीबार केला. विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली. विजयला तातडीने ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विजय घरातला एकुलता एक कमावता मुलगा होता. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे वसई इथे आपल्या कुटुंबासोबत वेगळा राहत होता. सोमवारी गाडीच्या सर्विसिंगच्या पैश्यांवरून दोघात वाद झाला.

विजयने गाडी सर्विस करण्यासाठी टाकली होती. त्याची माहिती देण्यासाठी तो वडिल भगवान यांच्याकडे आला होता. त्यानंतर सर्विसच्या पैशांवरून भगवान आणि विजय यांच्यात वाद झाला आणि काही कळायच्या आत भगवान यांनी विजयवर गोळीबार केला. यावेळी त्यांचा दुसरा मुलगा सुजय सुद्धा सोबत होता. विजयला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता त्यालाही गोळी लागली.

दोन्ही भाऊ जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत होते. घटनेची माहिती कळताच कुटुंबीयातील इतर सदस्य धावून आले आणि तातडीने विजय आणि सुजयला इंद्रावती रुग्णालयात दाखल केले आहे. पण, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

विश्वनाथन आनंदसह 'चीटिंग' करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर,घटनेनंतर होतायंत ट्रोल

भगवान पाटील हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. त्यांच्याकडे परवान असलेले पिस्तुल आहे. याआधीही त्यांनी मेहुणा आणि नगरसेवक राजू पाटील यांना देखील पिस्तुलीचा धाक दाखवला होता. पोलिसांनी तेव्हा पिस्तुल जप्त केले होते. त्यानंतर ताकीद देऊन पिस्तुल पुन्हा ताब्यात दिले होते. काही दिवस उलटत नाही तेच भगवान पाटील यांनी आपल्याच लेकरावर रागाच्या भरात गोळीबार केला. या घटनेमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Daughter, Father, Gun firing, Shot, Shot dead