मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तुमची इच्छा असेल तर माघार घेते', धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर रेणू शर्मा मागे हटणार?

'...तुमची इच्छा असेल तर माघार घेते', धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर रेणू शर्मा मागे हटणार?

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेेने ट्विटरवरून पुन्हा एकदा तिची भूमिका मांडली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 15 जानेवारी: राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. शिवाय त्यांनी दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सर्वत्र हिच चर्चा होती. दरम्यान धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री उशिरा प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर होत असलेले आरोप ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी देखील सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील रेणू शर्मावर हनी ट्रॅपचा आरोप केल्यानंतर तिने पुन्हा एकदा काही ट्वीट्स केले होते. भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत.

त्यानंतर आता रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं. मनसे नेते मनिष धुरी यांनी देखील तिच्यावर आरोप केले आहेत. कृष्णा हेगडे यांनी असे म्हटले होते की, 2010 पासून ही महिला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणाऱ्या गटाची बाजू अधिक मजबूत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

रेणू शर्माने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

तिने पुढे असं देखील म्हटलं आहे की, कृष्णा हेगडेंनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते. तक्रारदार रेणू शर्माने असं म्हटलं आहे की, 'एक काम करा तुम्ही सर्वांनीच निर्णय घ्या, काहीही माहित नसूनही जे मला ओळखतात किंवा जे ओळखत नाहीत ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून ठरवा, मी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे माघार घेते'.

रेणू शर्माने असा देखील सवाल केला आहे की त्यांच्यावर आरोप करणारे याआधी का पुढे आले नाहीत. त्या म्हणाल्या की, 'आता जरी मी मागे हटले तरी मला माझा अभिमान असेल. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढते आहे.' रेणू शर्माने ट्विटरवरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक ट्वीट्स करत त्यांची बाजू मांडली आहे.

First published:

Tags: Dhananjay munde