• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • डेड की ब्रेन डेड? गफलत झाल्यानं नातेवाईकांनी केली अंत्यविधीची तयारी; ऐनवेळी श्वास सुरू झाला अन्...

डेड की ब्रेन डेड? गफलत झाल्यानं नातेवाईकांनी केली अंत्यविधीची तयारी; ऐनवेळी श्वास सुरू झाला अन्...

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

डॉक्टरांनी दिलेली माहिती चुकीची ऐकू गेल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय जळगावात आला आहे. ऐनवेळी श्वास सुरू झाल्याने रुग्णाचा जीव वाचला आहे.

 • Share this:
  जळगाव, 07 ऑक्टोबर: जळगावातील हिराशिवा कॉलनीत एक विचित्र घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेली माहिती वेगळीच ऐकू गेल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णाच्या अत्यविधीची तयारी केली होती. पण ऐनवेळी वृद्धाचा श्वास सुरू झाल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. अचानक श्वास सुरू झाल्यानं नातेवाईकांनी अंत्ययात्रा अर्ध्यावरच थांबवली आहे. यांनतर संबंधित वृद्धाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रात्री  अकरा वाजेपर्यंत वृद्धाचा श्वास सुरू होता. राजेंद्र सीताराम सोनवणे (Rajendra Sitaram Sonawane) असं संबंधित  62 वर्षीय वृद्ध रुग्णाचं नाव असून ते हिराशिवा कॉलनीतील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनवणे यांना हृदयविकाराचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वी सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. दरम्यान बुधवारी अचानक त्यांना फिट्सचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी सोनवणे यांना जळगावातील सारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी याठिकाणी डॉक्टरांनी सोनवणे यांचा ब्रेड डेड होत असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच यांचे काहीच तास उरले आहेत, त्यामुळे घरी जाऊन त्यांची सेवा करा, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पण नातेवाईकांना ब्रेन डेड ऐवजी फक्त डेड असंच ऐकून गेलं. यानंतर वृद्धाचे नातेवाईक गोंधळून जाऊन त्यांनी अन्य नातेवाईकांना सोनवणे याचं निधन झाल्याची माहिती दिली. यामुळे सर्व नातेवाईक घरी आले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. हेही वाचा-लघवीला गेला अन् 97 लाखांना मुकला; पुण्यातील व्यावसायिकासोबत घडली विपरीत घटना अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्यानंतर अंत्ययात्रा सुरू होणार इतक्यात सोनवणे यांचा श्वास पुन्हा सुरू झाला. हे पाहून सुरुवातीला कुटुंबीयांना देखील धक्का बसला. यानंतर सोनवणे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचा श्वास सुरू होता.
  Published by:News18 Desk
  First published: