जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारनं दाखवावी, भाजप आमदाराचं पत्र

रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारनं दाखवावी, भाजप आमदाराचं पत्र

रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारनं दाखवावी, भाजप आमदाराचं पत्र

भारताची भक्कम पाठराखण करणाऱ्या फ्रान्सच्या विरोधात मुंबईतील भेंडी बाजारात निदर्शने करणारे कोणाचे समर्थन करतायत?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑक्टोबर: चीन विरोधात उभ्या ठाकलेल्या भारताची भक्कम पाठराखण करणाऱ्या फ्रान्सच्या विरोधात मुंबईतील भेंडी बाजारात निदर्शने करणारे कोणाचे समर्थन करतायत? हे आझाद मैदानात दंगे करणाऱ्यांचे भाईबंद आहेत. राज्य सरकारने अशा आंदोलन कर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. हेही वाचा… VIDEO : फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात हजारो लोक एकत्र; काँग्रेस आमदारावर गुन्हा कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणाऱ्या रझा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही अशा स्वरूपाचे आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्याचबरोबर असं कृत्य करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारनं दाखवावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

जाहिरात

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आज चीन कडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारताच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या विरोधात महाराष्ट्रात रझा अकादमीचे लोक निषेध करत आहे. या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगावे, असा प्रश्न सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच चीन मध्ये मुस्लिम समाजावर इतके अत्याचार होत असताना रझा अकादमी गप्प का होती?, असा सवाल सुद्धा आ. भातखळकर यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , france , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात