Home /News /national /

फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात हजारो लोक एकत्र; काँग्रेस आमदारावर गुन्हा, पाहा धक्कादायक VIDEO

फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात हजारो लोक एकत्र; काँग्रेस आमदारावर गुन्हा, पाहा धक्कादायक VIDEO

फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात झालेल्या निदर्शनांवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची मोठी कारवाई

    भोपाळ, 30 ऑक्टोबर : मोहम्मद पैगंबर संबंधात भाष्य करणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भोपाळमध्ये जोरदार प्रदर्शनं करण्यात आली आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेल्या विधानाविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी झालेल्या निषेधावर शिवराजसिंग चौहान यांनी कठोर भूमिका घेत आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. गुरुवारी मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येऊन फ्रान्सच्या अध्यक्षांविरोधात निदर्शनं केली होती. गुरुवारी भोपाळच्या इक्बाल मैदानावर करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते. भोपाळ सेंट्रलचे काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी हे आयोजन केलं होतं. हातात बॅनर, पोस्टर्स आणि फलक लावून निदर्शकांनी घोषणाबाजी केली. भोपाळच्या पोलीस ठाण्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. मध्य प्रदेश हा शांततापूर्ण प्रदेश आहे. या प्रदेशाची शांतता भंग करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि इथे कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याला पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा-'OLX पर बेच दे...' म्हणत एकच गाडी 12 वेळा विकली; आणि... फ्रान्समध्ये हल्ल्याचे पडसाद मुंबईत देखील पाहायला मिळाले आहेत. मुंबईतील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या भेंडी बाजार भागात फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स रस्त्यावर पाहण्यास मिळाले. रस्त्यावर ठिकठिकाणी मॅक्रॉन यांचे पोस्टर लावण्यात आले होते. रझा अकादमीने हे कृत्य केले आहे. रझा अकादमीच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या