जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ratnagiri Corona Dengue : चाकरमाने आल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूनमध्ये कोरोना, डेग्युसदृश्य रुग्ण वाढले

Ratnagiri Corona Dengue : चाकरमाने आल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूनमध्ये कोरोना, डेग्युसदृश्य रुग्ण वाढले

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात

डेंग्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांमध्ये व्यक्तीला खूप ताप येतो. पण या आजाराचं लवकर निदान न झाल्यास, अनेक रुग्ण चुकीचे उपचार घेतात

ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहरात डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रक्तातील पेशी अचानक कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Ratnagiri Corona Dengue)

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 01 सप्टेंबर : ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहरात डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रक्तातील पेशी अचानक कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Ratnagiri Corona Dengue) चिपळूण शहरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 7 जणांचे सॅम्पल टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवल्याची आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली आहे. अनेक  रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचीही माहिती आहे. गणेशोत्सवाच्या काळात अचानक रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हजारो चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, तपासणीत आरोग्य विभागाला 34 चाकरमान्यांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळली. त्याचवेळी दोन कोरोनाबाधितही आढळले आहेत. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दरवर्षी हजारो चाकरमानी आपापल्या मूळ गावातील घरी येतात. यावर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 50 हजारांहून अधिक चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

हे ही वाचा :  मोहितेंच्या बाप्पाला कावेरीच्या हातचे मोदक; मालिकेत गणरायाच्या नैवेद्याची जय्यत तयारी

या चाकरमान्यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन कोरोनाबाधित तर 34 जणांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळली. आरोग्य विभागाकडून रेल्वे, एसटी बसस्थानकांसह महामार्गावर 21 ठिकाणी पथके तैनात केली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी समूळ नष्ट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या पथकाने दक्षता घेतली. गर्दीमुळे प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना सूचना देऊन कुटुंबातील लोकांशी त्यांचा संपर्क टाळण्यास सांगितले जात आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  एका पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी, सर्वात साक्षर राज्यातला धक्कादायक VIDEO

29 ऑगस्टपर्यंत 32 हजार 261 चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले. त्यात रेल्वेने 10 हजार 633, एसटीने 3 हजार 529, खासगी ट्रॅव्हल्सने 2 हजार 924 आणि खासगी वाहनातून 2 हजार 924 प्रवासी आले. 30 ऑगस्टला सायंकाळपर्यंत दहा हजारांहून अधिक चाकरमानी गावागावात आले आहेत. कोरोना सदृश चाकरमान्यांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाने केली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात