Home /News /national /

धक्कादायक! पोलीस ठाण्यातूनच चालवलं जात होतं सेक्स रॅकेट, असं फुटलं बिंग

धक्कादायक! पोलीस ठाण्यातूनच चालवलं जात होतं सेक्स रॅकेट, असं फुटलं बिंग

दोन पोलीस हवालदारांनी (Police) पोलिसांच्या खाकी वर्दीला कलंक लावला आहे. या दोन्ही पोलिसांनी पोलीस चौकीलाच अय्याशीचा तळ (Sex racket) बनवला होता.

    पीलीभीत, 18 जानेवारी: देशात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. एरवी मोठ्या शहरांत सुरू असलेलं सेक्स रॅकेट उघडं करण्यात पोलिसांचा मोठा हात असतो. परंतु पोलिसचं सेक्स रॅकेट चालवत होते. हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या धक्कादायक घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात बसून सेक्स रॅकेट चालवत होते. फोन संभाषणाचं रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या घटनेचं बिंग फुटलं आहे. सदर घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील आहे. येथील दोन पोलीस हवालदारांनी पोलिसांच्या खाकी वर्दीला कलंक लावला आहे. या दोन्ही पोलिसांनी पोलीस चौकीलाच अय्याशीचा तळ बनवला होता. या दोघांनी कॉलगर्लच्या माध्यमातून अनेक लोकांना ब्लॅकमेल केलं आहे. या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलीस शिपायाने कॉलगर्लशी बोलतानाचा ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर पोलिसांच्या सेक्स रॅकेटचा काळाबाजार बाहेर आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी दोन्ही हवालदारांना निलंबित केलं आहे. तसेच त्यांच्यावर विभागीय कारवाईची शिफारसही केली आहे. संबंधित प्रकरण पीलीभीतच्या सेहरामऊ पोलिस स्टेशनच्या गडवाखेडा चौकीतील आहे. येथे ड्युटीवर असलेले हवालदार वितीन मिश्रा आणि पवन मिश्रा दोघंही गेल्या काही दिवसांपासून अवैध मार्गाने पैसे कमवत होते. तेथिल लोकल कॉल गर्लला हाताशी धरून हे दोघंही अनेक ग्राहकांना ब्लॅकमेल करत होते. जेव्हा ग्राहक कॉलगर्लसोबत आक्षेपार्ह स्थितीत असायचा, तेव्हा पोलीस तिथे छापा टाकत असत. त्यानंतर त्यांना सोडून देण्यासाठी संबंधित ग्राहकांकडून बक्कळ पैसा उकळत असत. संबंधित कॉल रेकॉर्डींगमध्ये हाही खुलासा झाला आहे की, या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित कॉलगर्ल सोबत अनेक वेळा अवैध शरीरसंबंध प्रस्थापित केला होता. असं प्रकरण समोर आलं या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या दुसऱ्या एका पोलीस शिपायाने संबंधित कॉल गर्लला फोन केला आणि तिला सर्व माहिती विचारली. त्यानंतर संबंधित कॉलगर्लने या पोलीसाला सर्व माहिती सांगून टाकली. या पोलिसाने ही सर्व माहिती रेकॉर्ड केली. त्यानंतर हा ऑडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियाच्या माध्यमांमधून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Sex racket

    पुढील बातम्या