मुंबई, 03 जुलै : 'त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या कानात सांगितलं होतं, तसं झालं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वीच दिसली असती आणि आज पलटी सुद्धा झाली असती' असं म्हणत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना टोला लगावला.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दांत भाषण केलं.
'ठीक आहे, आज त्यांनी बहुमताचा आकडा दाखवला आहे. आमचंही ठरलेलं आहे. आमचा व्हीप आहे तोच राहणार आहे' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका ठाम राहणार आहे, असं स्पष्ट केलं.
'पण आपण तिथे बसला आहात, सुधीर मुनगंटीवार तुम्ही म्हणाला की, तेव्हा कानात सांगायला हवं होतं. त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या कानात सांगितलं होतं, तसं झालं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वीच दिसली असती आणि आज पलटी सुद्धा झाली असती, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
'जुने दिवस आठवत आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीच्या जवळचे आहे आणि आमच्याही संपर्कातले आहात. त्यामुळे फडणवीस यांनी नार्वेकर यांना राष्ट्रवादीचा जवळचा माणूस अध्यक्षस्थानी आहे,
विधानसभा अध्यक्षपदी आज तरुण अध्यक्ष मिळाला आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. खरंच तरुणांना यात पडावं वाटेल का? आज राजकारण खुप वाईट स्थितीचा पोहचले आहे. आज जे चालले आहे ते पाहुन खरंच तरूणांना राजकारणात यावे असे वाटेल का? हा प्रश्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News