जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमदार रोहित पवार अडचणीत! बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशीसाठी राम शिंदे आक्रमक

आमदार रोहित पवार अडचणीत! बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशीसाठी राम शिंदे आक्रमक

बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशीसाठी राम शिंदे आक्रमक

बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशीसाठी राम शिंदे आक्रमक

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार राम शिंदे यांनी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे केली होती. मात्र, त्यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी क्लिन चीट दिली होती. आता सत्तांतर झाल्यानंतर राम शिंदे पुन्हा आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काय म्हणाले राम शिंदे? राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड दीड महिन्यानंतर निवृत्त होतायेत, त्यांच्यावर ज्यांची मेहरबानी झाली होती त्यांच्याशी प्रमामाणिक राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण, त्यांनी शासन निर्णयाच्या विरोधात काम केलंय, असा आरोप करत राम शिंदे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. पुढे राम शिंदे म्हणाले, की मी माझ्या आरोपांवर ठाम आहे. 10 ऑक्टोबरला बारामती ॲग्रो साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यानंतर मी साखर आयुक्तांना व्हिडीओ दिले. तसेच आवश्यक ते पुरावे दिले आहेत. त्या कारखान्याची तत्काळ चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र, 20 तासांनंतर साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी साखर कारखाना तपासणीसाठी कारखान्यावर गेले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मेहरबानीने झालेला हा प्रकार आहे. त्यानंतर त्यांनी कारखान्याला क्लिन चीट दिली. वाचा - शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप या संदर्भात आमदार राम शिंदे यांनी आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राम शिंदे – रोहित पवार वाद चव्हाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञात आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपने राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली होती. या कारखान्यावरून दोघांतील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात