मुंबई, 23 डिसेंबर : भाजप नेते राम कदम हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. यावेळी चर्चेच कारण म्हणजे त्यांनी केलेली प्रतिज्ञा, जोपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांना पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही अशी प्रतिज्ञाच राम कदम यांनी केली आहे. माझा मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये काही डोंगराळ भाग आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाहीये, जोपर्यंत तीथे नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राम कदम ? जोपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांना पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही अशी प्रतिज्ञाच राम कदम यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, माझ्या घाटकोपर मतदारसंघात काही भाग डोंगराळ आहे. या भागात अनेक दिवसांपासून पाणी नाहीये. मतदारसंघाची लोकसंख्या वाढली, घरांची संख्या वाढली मात्र पाण्याचे प्रमाण वाढले नाही. दुर्दैवानं काही लोकांनी पाण्याचा व्यापार केला. पण आता जोपर्यंत तीथे नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. तसंच मी जे बोलतो ते मी करतो असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे.

)







