रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर चक्क भाजप नेत्यानं जोडले हात, केला 'हा' गौप्यस्फोट

रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर चक्क भाजप नेत्यानं जोडले हात, केला 'हा' गौप्यस्फोट

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री तथा जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी रान पेटवून दिलं आहे.

  • Share this:

जालना, 14 डिसेंबर: शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री तथा जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे (BJP Leader Danave)यांनी रान पेटवून दिलं आहे.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. मात्र, आता चक्क भाजप नेत्यानं दानवेंच्या प्रश्नावर पत्रकारांसमोर हात जोडले.

हेही वाचा..रावसाहेब दानवेंची जीभ छाटण्याची सुपारी देणाऱ्या शिवसैनिकाविरुद्ध भाजप आक्रमक

देशभर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत असल्याचं म्हटलं होतं. दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केल्यानं त्यांच्या टोकेची झोड उठली आहे. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड (Rajyasabha MP Bhagwat karad)  यांना 'News 18 लोकमत'ने प्रश्न केला होता. मात्र, या विषयावर मी काहीही न बोललेलंच बरं, असं म्हणत खासदार भागवत कराड यांनी थेट आपले दोन्ही हात जोडले. शेतकरी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेनिमित्त खासदार कराड जालन्यात आले होते.

भागवत कराड यांचा गौप्यस्फोट

केंद्र सरकार कृषी कायद्याबाबत आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. मात्र आंदोलक हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर कायम असून त्यांची भूमिका अडेलटट्टूपणाची आहे. लोकशाही असल्याने शेतकऱ्यांचं हित या कायद्यात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्द होणार नाही, असं भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड यांनी सांगितलं. ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषी कायदयाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी जालन्यात भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कराड यांनी हा आरोप केला.

हेही वाचा...काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत  

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) राज्यसभेत एक शब्दही बोलले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी फक्त शरद पवार यांचा या कायद्याबाबत सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं एवढंच बोलले, असा आरोप भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या