• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध, भाजपनं स्विकारला काँग्रेसचा प्रस्ताव; संजय उपाध्याय यांची माघार

राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध, भाजपनं स्विकारला काँग्रेसचा प्रस्ताव; संजय उपाध्याय यांची माघार

अखेर महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतंय.

 • Share this:
  मुंबई, 27 सप्टेंबर: काँग्रेस नेते (Congress leader) राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं प्रयत्न केले होते. अखेर महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतंय. काँग्रेसच्या विनंतीनंतर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार अर्ज दाखल केलेले संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. हेही वाचा- Video: अडसूळ यांना EDचे समन्स, समोर आली रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया  काँग्रेसनं केलेली विनंत मान्य करुन भाजपनं माघार घेतली आहे. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या भेटीनंतर काँग्रेसनं केलेल्या विनंतीवर देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. हेही वाचा- मोठी बातमी: आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांची घोषणा आता काँग्रेसनं केलेल्या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ही माहिती दिली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: