कोल्हापूर, 18 जून : मागच्या दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत (former minister sadabhau khot) यांच्याकडे रस्त्यात आडवून एका हॉटेल मालकाने जूनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 2014 सालापासून उधारी दिली नसल्याने संतप्त हॉटेल मालकाने सदाभाऊंवर थेट आरोप केले. यानंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकावरही आरोप केले. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचे शेट्टी म्हणाले.
सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याचे माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
हे ही वाचा : Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, चेक करा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील एका हॉटेलवाल्याने गुरूवारी (दि. १६) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून 2014 सालची उधारी मागितली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी 'मी याची कसलीही उधारी केलेली नाही आणि अशोक शिनगारे याला मी ओळखत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला पाठवून हा स्टंट केला आहे, असा आरोप केला होता.
याच दरम्यान सदाभाऊ खोत यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिनगारे हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनातही सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. मात्र, पूर्वी होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केले होते असे ही शेट्टी म्हणाले.
हे ही वाचा : Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्याचा 'हा' पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी हालचाली कृषी मंत्र्याचे आश्वासन
हॉटेल मालक शिनगारे म्हणतात
दरम्यान हॉटेल मालक शिनगारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले कि,पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीचे नाव सदाभाऊ घेत आहेत , पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नाही. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे.
मात्र सदाभाऊंनी माझ्या हॉटेलची आठ वर्षांपूर्वीची उधारी आधी द्यावी अशी मागणी केली. हॉटेल 'मामा भाचे' हे माझ्या मालकीचे असून मी ते चालवायला माझ्या भाच्याला दिले आहे. सदाभाऊ खोटी माहिती देऊन पैसे बुडवायचा तयारीत असले तरी मी माझे पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही, ते येतील तेव्हा त्यांच्या गाड्या अडवणार असल्याची भूमिका घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raju Shetti, Raju Shetti (Politician), Sadabhau khot, Swabhimani Shetkari Sanghatana