मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी?

राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्येसभेवर संधी की विधानसभेची उमेदवारी?

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिवंगत राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांच्या नजरा.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिवंगत राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांच्या नजरा.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिवंगत राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांच्या नजरा.

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या नावांची चर्चा होत आहे त्यामध्ये राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांच्याही नावाचा समावेश आहे.

प्रज्ञा सातव राज्यसभेवर की विधानसभेची उमेदवारी?

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आता राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अशीही चर्चा होत आहे की, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर उमेदवारी न देता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी 3 नावे चर्चेत

राजीव सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे सातव यांच्या निधनाने दोन पदे रिकामी झाली आहेत. आता राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी आणि गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाकडून होत आहे. तर त्याच दरम्यान माजी केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा रंगत आहे.

राजीव सातवांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के मार्क्स

राज्यसभेसाठी पोटनिवडणूक

महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Congress, Rajiv Satav, Rajya sabha