मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाव्हायरसवर मात पण Black Fungus नं जीव घेतला; कित्येकांचा बळी घेणारा भयंकर आजार

कोरोनाव्हायरसवर मात पण Black Fungus नं जीव घेतला; कित्येकांचा बळी घेणारा भयंकर आजार

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आता दुर्मिळ आणि जीवघेणं असं फंगल इन्फेशन (Fungal Infection) दिसू लागलं आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आता दुर्मिळ आणि जीवघेणं असं फंगल इन्फेशन (Fungal Infection) दिसू लागलं आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आता दुर्मिळ आणि जीवघेणं असं फंगल इन्फेशन (Fungal Infection) दिसू लागलं आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : पश्चिम दिल्लीतल्या 32 वर्षांच्या एका पुरुष रुग्णाला कोविड-19 मुळे (covid 19) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सात दिवसांनी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. पण त्याच्या डाव्या नाकपुडीतून श्वास घेण्याला अडचण निर्माण झाली आणि दोन दिवसांत त्याच्या डोळ्याला सूज आली. त्यानंतर त्याने पुन्हा वैद्यकीय सल्ला घेतल्यावर म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) झाल्याचं निदान झालं. त्याला हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत त्याची दृष्टी धूसर व्हायला सुरुवात झाली होती. तसंच त्याच्या शरीराची डावी बाजू सुन्न पडायला सुरुवात झाल्यामुळे तो विचित्र अवस्थेत होता. 'टाइम्स नाऊ'मध्ये आलेल्या वृत्तात सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या (Sir Gangaram Hospital) डॉक्टर्सनी दिल्लीतल्या एका पेशंटची दिलेली ही केस स्टडी. दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या  अनेक पेशंटना म्युकॉर्मायकॉसिस नावाचा बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) झाला असून, कोविड-19 (COVID-19) हे त्यामागचं कारण असल्याचा दावा तिथल्या डॉक्टर्सनी केला आहे. या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते, तसंच नाक आणि जबड्याच्या हाडांवर (Nose & Jaw Bones) दुष्परिणाम होतो आणि 15 दिवसांत याचा संसर्ग मेंदूपर्यंत (Brain) पोहोचल्यास पेशंटच्या मृत्यूची शक्यता 50 टक्के असते. गेल्या 15 दिवसांत सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या कान-नाक-घसा तज्ज्ञांना (ENT Experts) कोविड-19मुळे झालेल्या म्युकॉर्मायकॉसिसच्या 13 केसेस आढळल्या आहेत. त्याचं प्रमाण एकूण पेशंट्सच्या 50 टक्क्यांहून अधिक असून, पेशंटची दृष्टी जाणं, तसंच नाक आणि जबड्याचं हाड काढून टाकावं लागणं आदींची गरज पडली आहे. पाच पेशंट्सचा मृत्यू झाला असल्याने मृत्यूदर 50 टक्के आहे. संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचणं हे पेशंटच्या मृत्यूचं कारण ठरत असल्याचं हॉस्पिटलने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या पंधरवड्यात दिल्लीतल्या 10 पेशंट्सवर डॉक्टर्सना तातडीने शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यापैकी सुमारे 50 टक्के पेशंट्सना दृष्टी (Eyesight) कायमस्वरूपी गमवावी लागली. आणखी गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे पाच पेशंट्सना अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं. या पेशंट्सपैकी पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचं हॉस्पिटलने जाहीर केलं आहे. म्युकॉर्मायकॉसिस म्हणजे काय? म्युकॉर्मायकॉसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकॉर्मायकॉसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब आहे, असं सर गंगाराम हॉस्पिटलनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हे वाचा - "मी Pfizer ची कोरोना लस घेणार नाही", फायझर कंपनीच्या CEO नीच दिला नकार या विकाराला झायगोमायकॉसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखलं जातं. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात सीडीसीच्या (CDC) म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दुर्मिळ आहे. म्युकॉर्मायसिट्स (Mucormycetes) नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते, तेव्हाच तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुप्फुसं, तसंच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमांमधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. ही बुरशी बहुतांश माणसांसाठी धोकादायक नाही; मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा व्यक्तींच्या श्वसनातून ती शरीरात गेल्यास फुप्फुसे (Lungs) किंवा सायनसमध्ये (Sinus) त्यांचा संसर्ग होऊ शकतो आणि शरीराच्या अन्य भागांतही तो पसरू शकतो, असं सी़डीसीनं म्हटलं आहे. म्युकॉर्मायकॉसिसची लागण संसर्गजन्य (Contagious) नाही. म्हणजेच एकापासून दुसऱ्याला किंवा प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही, असंही सीडीसीनं स्पष्ट केलं आहे. लवकर योग्य निदान आणि योग्य बुरशीप्रतिकारक उपचार करणं हे पेशंट्स लवकर बरे होण्यासाठी आवश्यक असल्याचं सीडीसीनं म्हटलं आहे. हे वाचा - फक्त हाती हात होते.... कोरोनानं मृत्यू दिला, त्यालाही दोघं एकत्र सामोरे गेले कोविड-19मुळे म्युकॉर्मायकॉसिस होणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा वेग या गोष्टी पूर्वी कधीही पाहिल्या गेलेल्या नाहीत आणि त्या धक्कादायक आणि धोकादायक आहेत, असं हॉस्पिटलमधील वरिष्ठ ईएनटी सर्जन मनीष मुंजाल यांनी सांगितलं. नाकात अडथळे निर्माण होणं, डोळ्याला किंवा गालांना सूज येणं, नाकात काळे सुके क्रस्ट्स (Crusts) तयार होणं ही याची प्राथमिक लक्षणं आहेत. तातडीने बायोप्सी (Biopsy) करून अँटीफंगल ट्रीटमेंट (Antifungal Treatment) अर्थात बुरशीला प्रतिकार करणारी उपचारपद्धती अवलंबणं आवश्यक आहे, असं त्याच हॉस्पिटलमधले कन्सल्टंट ईएनटी सर्जन (ENT Surgeon) वरुण राय यांनी सांगितलं. अन्य शहरांत हा रोग आढळला का? अहमदाबाद (Ahmedabad) आणि बंगळुरू (Bengaluru) या शहरांतही म्युकॉर्मायकॉसिस आढळला आहे. अहमदाबादमध्ये पाच जणांना याची लागण झाली आहे. ते पेशंट्स कोरोनातून नुकतेच बरे झालेले आहेत किंवा सध्या कोरोनाबाधित आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांची दृष्टी गेली आहे. बेंगळुरूमध्येही कोरोनाची लागण झालेल्या चौघांना म्युकॉर्मायकॉसिस झाल्याचं वृत्त असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Health

    पुढील बातम्या