वॉशिंग्टन, 16 डिसेंबर : फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (BioNTech) या कंपन्यांनी विकसित केलेली कोविड-19 (COVID19) प्रतिबंधक लस (Vaccine) ही आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली पहिली लस ठरली आहे. ब्रिटनमध्ये (UK) या लशीच्या लशीकरणाचा (Vaccination Drive) कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर अमेरिकेनंही आपात्कालीन परिस्थितीत ही लस वापरण्याची मंजुरी दिली आहे. अमेरिकेने सोमवारी व्यापक लशीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली. कॅनडानेही कोविड प्रतिबंधक लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. तसंच सिंगापूरनेही फायझर-बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून डिसेंबरअखेरपर्यंत पहिली बॅच सिंगापूरला पोहोचणार आहे. मात्र ज्या फायझर कंपनीनं ही लस तयार केली त्या कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरुला (Albert Borula) यांनी मात्र ही लस घेण्यास नकार दिला आहे. जी कोरोना लस मिळवण्यासाठी इतर देशांनी धडपड केली ती लस तयार करणाऱ्या फायझर कंपनीनचे सीईओ अल्बर्ट बोरुला (Albert Borula) यांनी मात्र त्यांना लस सहजरित्या उपलब्ध होत असतानाही त्यांनी ही लस घेतली नाही. त्यामुळे लशीबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.
Pfizer‘a CEO says he won’t get the vaccine because he doesn’t want to cut the line.
— Kevin Sorbo (@ksorbs) December 15, 2020
Seems awfully suspicious
सीएनएनने (CNN) दिलेल्या वृत्तानुसार, स्वतःसाठी किंवा कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला लस मिळण्यासाठी आपण प्राधान्यक्रम मोडू इच्छित नाहीत, असं अल्बर्ट बोरुला यांनी सांगितलं. सीएनएनच्या संजय गुप्ता यांच्याशी बोलत असताना अल्बर्ट यांनी यामागची कारणं स्पष्ट केली.
“अमेरिकेत लशीकरण कार्यक्रम सुरू झाला असून लशीचे मर्यादित डोस (Dose) उपलब्ध आहेत. ज्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. अशा व्यक्तींच्या गटांना तसंच युद्धपातळीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health workers) लशीकरण कार्यक्रमात प्राधान्य दिलं जात आहे. हा प्राधान्यक्रम मोडून आम्ही अगोदर लस घेणं योग्य ठरणार नाही. कारण मी फ्रंटलाइन वर्कर (Frontline) म्हणजेच आरोग्यसेवेत थेट काम करणारा नाही. मी 59 वर्षांचा आहे आणि माझं आरोग्यही चांगलं आहे. असं असताना मी ठरलेला क्रम मोडून अगोदर लस घेणं योग्य नाही”, असं बोरुला यांनी सांगितलं. तसंच बोरुला यांनी लोकांना विज्ञानावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही लस कोणतीही तडजोड न करता किंवा कोणताही शॉर्टकट न वापरता विकसित करण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे वाचा - पहिल्या टप्प्यातील चाचणीचा परिणाम समोर; Made in india कोरोना लशीबाबत मोठी माहिती बोरुला यांनी स्वतः प्राधान्याने लस न घेण्याचा हेतू स्पष्ट केला असला तरी त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. यात काही तरी काळंबेरं (Fishy) आहे, असा संशय व्यक्त केला जातो आहे. बोरुला यांनी स्वतः लस टोचून घेतली, तर एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं जाईल आणि आणखी अनेकांना ही लस घेण्याची प्रेरणा मिळेल, असा सल्ला एका ट्विटर युझरने (Twitter User) त्यांना दिला आहे. अनेकांनी ट्विटरवर अशाच आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेत सर्वप्रथम लस टोचून घेण्याचा मान न्यूयॉर्कमधल्या (New York) एका नर्सला मिळाला आहे. फायझर-बायोएनटेकची लस तिला देण्यात आली आणि त्या घटनेचं टीव्हीवरून लाइव्ह प्रसारणही करण्यात आलं. लाँग आयलंड ज्यूइश मेडिकल सेंटरच्या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या सँड्रा लिंडसेला (Sandra Lindsay) हा मान मिळाला. “मला खूप छान वाटतं आहे, मुक्त झाल्यासारखं वाटतं आहे”, अशी भावना तिनं लस घेतल्यावर व्यक्त केली. सर्वांनी लस टोचून घ्यावी असं आवाहनही तिनं केलं. “आपल्या इतिहासातल्या सर्वांत त्रासदायक कालखंडाच्या अंताची ही सुरुवात आहे”, असं ती म्हणाली. हे वाचा - रेसिंग किंगपासून Vaccine King चं बिरूद मिरवणारा पुणेकर! डॉ सायरस पुनावाला अमेरिकेसह अन्य देशांतल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लशीच्या उपयोगितेवर उपस्थित केले जाणारे प्रश्न, लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्या, तसंच सुरक्षिततेच्या नियमांमध्ये सगळीकडे समानता नसणं, यांसारख्या प्रश्नांना आरोग्य कार्यकर्त्यांना, तज्ज्ञांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाच्या लाटेची स्थिती अशी भयावह असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची सुरुवात झाली आहे.